AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर सरकार झुकलं! झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलनाला यश, मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा

Jharkhand Student Protest : झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोमवारी JSSC-CGL परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

अखेर सरकार झुकलं! झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलनाला यश, मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा
Jharkhand Student Protest SuccessImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 17, 2026 | 10:50 PM
Share

झारखंडमध्ये भरती परीक्षांबाबत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोमवारी JSSC-CGL परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, TDPL शी संबंधित सर्व गोष्टी रद्द करण्यात येणार आहेत. यामध्ये TDPL कडून घेण्यात आलेल्या परीक्षा, जाहीर करण्यात आलेले निकाल, निवड झालेले उमेदवार आणि त्यासंबंधीच्या इतर सर्व प्रक्रियांचाही समावेश आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुख्यमंत्री सोरेन काय म्हणाले?

परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,’आज हा विषय संपवण्यासाठी आम्ही मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेतली. यामध्ये सर्व बाबींवर तोडगा काढत आम्ही निर्णय घेतला आहे की, TDPL कडून घेण्यात आलेल्या परीक्षा, त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलेले निकाल, निवड करण्यात आलेले उमेदवार तसेच इतर सर्व प्रक्रिया रद्द करण्यात येत आहेत.’

वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली समिती स्थापन होणार

झारखंड सरकारने भरती परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. वरिष्ठ IAS अधिकारी अमिताभ कौशल यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा सुधारणा समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितले की, ‘ही समिती परीक्षा प्रणालीतील त्रुटींचा आढावा घेणार असून भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह करण्यासाठी आवश्यक सूचना देणार आहे.’

JSSC आणि JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड सरकारने 2014 पासून आउटसोर्स एजन्सी TSR Data Processing Pvt Ltd (TSR/TDPL) कडून घेण्यात आलेल्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने झारखंड कर्मचारी निवड आयोगाची संयुक्त पदवीधर स्तरावरील परीक्षा (JSSC-CGL) देखील रद्द केली आहे. भरती परीक्षांमध्ये समोर आलेल्या कथित अनियमितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

देवेंद्र महतो काय म्हणाले?

परीक्षा रद्द झाल्याची बातमी समोर येताच जयपाल मुंडा स्टेडियममध्ये धरणे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आणि सरकारच्या निर्णयाची चर्चा सुरू झाली. परीक्षा रद्द झाल्यानंतर गेल्या 16 दिवसांपासून उपोषण करणारे देवेंद्र नाथ महतो यांनी, ‘मी उपोषण सोडणार आहे. मात्र संघर्ष सुरूच राहील.’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात