5

राज ठाकरेंच्या ‘टिवल्या बाहुल्या’!

सचिन गव्हाणे, टीव्ही 9 मराठी, मुंबई राज ठाकरेंच्या टिवल्या बाहुल्या सध्या महाराष्ट्रात प्रचंड गाजत आहेत. व्यंगचित्राच्या माध्यामातून एक निखळ हसूसोबत आपली राजकीय भूमिका राज ठाकरे आधिक कणखरपणे मांडताना दिसत आहेत. राज ठाकरेंच्या टिवल्या बाहुल्या म्हणजे त्यांच्या व्यंगचित्रातील पात्रं – पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. राज ठाकरे यांनी  दिवाळीपासून […]

राज ठाकरेंच्या 'टिवल्या बाहुल्या'!
Follow us
| Updated on: Feb 15, 2020 | 6:07 PM

सचिन गव्हाणे, टीव्ही 9 मराठी, मुंबई

राज ठाकरेंच्या टिवल्या बाहुल्या सध्या महाराष्ट्रात प्रचंड गाजत आहेत. व्यंगचित्राच्या माध्यामातून एक निखळ हसूसोबत आपली राजकीय भूमिका राज ठाकरे आधिक कणखरपणे मांडताना दिसत आहेत. राज ठाकरेंच्या टिवल्या बाहुल्या म्हणजे त्यांच्या व्यंगचित्रातील पात्रं – पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत.

राज ठाकरे यांनी  दिवाळीपासून भलताच गिअर टाकला आहे. दिवाळीत प्रत्येक दिवशी आपल्या कुंचल्यांनी राजकीय फटकेबाजी करणाऱ्या व्यंगचित्रांनी सोशल मीडियावर अक्षरश: धूमाकूळ घातला. राज ठाकरेंची व्यंगचित्रं मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

अवनी वाघीण मृत्यू प्रकरणावरील राज याचं व्यंगचित्र अफलातून असल्याचं अनेकांनी सांगितलं. ते व्यंगचित्र पाहिलं की हसू आवरत नाही.

गंभीर राजकीय विषयावर आपल्या व्यंगचित्रातून राज यांचा कटाक्ष आता मजा आणणार आहे.  राज ठाकरे यांची राजकीय भूमिका त्यांच्या व्यंगचित्रातून अधिक प्रखरपणे जाणवू लागली आहे.

राज ठाकरे व्यंगचित्र काढताना जबरदस्त एकाग्र असतात हे प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. टीव्ही 9 जेव्हा दिवाळीनिमित्त त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरातील दिवाळी दाखवत होतं, तेव्हा कॅन्व्हासमध्ये आकंठ बुडून व्यंगचित्र काढणारे राज ठाके अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले.

अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे  आणि त्यांची मुलगी उर्वशी त्यांच्या अवतीभोवती गराडा घालून बसले होते. परंतु राज ठाकरे आपल्या चित्रात इतके गुंतले होते की त्यांचं आजूबाजूला काय घडत आहे, याचं त्यांना देणंघेणंचं नव्हतं.

राज यांच्या टिवल्या -बाहुल्या दिवाळी प्रयोग प्रचंड गाजला. तो अजूनही सुपरहिट सुरु आहे. त्यांच्या काही प्रयोगची उजळणी

अंक पहिला – अभ्यंगस्नान     

व्यंगचित्रातील पहिल्या चित्रानेच महाराष्ट्रात हास्यकल्लोळ निर्माण केला. राज यांनी दिवाळीच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं अभ्यंगस्नान व्यंगचित्राच्या माध्यामातून दाखवलं. मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा रक्षक उघड्याबंब फडणवीसांना कानात विचारतो की महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आलाय? आत पाठवू का?

 अंक दुसरा- लक्ष्मीपूजन

मोदी , गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या फोटोला लक्ष्मी देवी विचारते की तुम्ही फेकलेल्या हजारो कोटीचे आकडे ऐकून मीही थक्क झाले.

अंक तिसरा – बलिप्रतिपदा

उद्धव आणि मुख्यमंत्री शेतकऱ्याला ओवळत आहेत, परंतु एक दमडीही यांना देवू  नका असं शेतक-याची बायको शेतक-याच्या कानात सांगताना पाहायला मिळाली.

 अंक चौथा – भाऊबीज

 एक गृहिणीने मोदींना मागच्यावेळी शुभेच्छा दिल्या, आज इतके घोटाळे पाहायला मिळत आहेत,  आरबीआय , राफेलसह अनेक मुद्दे या व्यंगचित्रात आले.

 जो या अंकाचा सिलसिल्ला सुरु झाला तो अजूनही सुरूच आहे. राणीबागेत महापौर दर्शन ते अवनी वाघीण मृत्यू प्रकरणात उद्धव,मुनगंटीवार , सीएम यांची उठवलेली टर, हे फटाक्यांची माळ लावल्यासारखं आहे. परंतु या माळेतील प्रत्येक फटाका कानाला हादरे देणारा आहे.

 स्व . बाळासाहेब ठाकरेंचे ‘मार्मिक’मधील आणि नंतर ‘सामना’तील व्यंगचित्र हे महाराष्ट्रातील शिवसैनिक आणि सामान्यांसाठी मेजवानी असते. माझे आजोबा सांगत की बाळासाहेबांच्या व्यंगचित्राची कात्रणं अजूनही काही जुन्या शिवसैनिकांकडे आहेत. त्यांनी मध्यतंरी त्यातील काही शिवसैनिकांची माझी भेट घालून दिली होती. राज ठाकरेंमध्ये आम्हाला साहेबांची लकब दिसते, असं ते अगदी मनापासून सांगत होते.

बाळासाहेबाचा प्रचंड सहवास राज यांना लाभला. त्यामुळे त्यांच्यातील बरेचसे गुण राज यांच्यातही पाहायला मिळातात. व्यंगचित्र हा ही त्यापैकीच एक गुण.

राज ठाकरेंच्या व्यंगचित्रांची वैशिष्टये म्हणजे ती थेट आणि धम्माल उडवून देणारी असल्याचं बरेच तरुण सांगतात. राज यांनी सोशल मीडियावर येऊन वर्ष उलटले आहे. त्यांचा व्यंगचित्रातून अनेक तरुण त्यांच्याकडे आजही आकर्षित होत आहेत. राजकीय दिवाळीच्या माध्यामातून सुरू केलेला हा टिवल्या बाहुल्यांचा प्रयोग हळूहळू सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

राज यांच्या व्यंगचित्राच्या धडाक्यामुळे माध्यमांना बातम्या आणि सामान्यांच्या चेहऱ्यावर थोडावेळ का नाही हसू फुललं आहे हे मात्र नक्की.

(ब्लॉगमधील मतं ही लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)

Non Stop LIVE Update
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?