Mumbai : समीर वानखेडेंविरोधात चैत्यभूमिवर घोषणाबाजी, मलिकांकडूनही वानखेडेंना पु्न्हा चिमटा

| Updated on: Dec 06, 2021 | 10:16 PM

वानखेडे विरोधक आणि समर्थक यांच्यात हमरीतुमरी झाल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र विरोधकाकडे दुर्लक्ष करत, समीर वानखेडेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं.

Mumbai : समीर वानखेडेंविरोधात चैत्यभूमिवर घोषणाबाजी, मलिकांकडूनही वानखेडेंना पु्न्हा चिमटा
नवाब मलिक आणि समीर वानखेडे
Follow us on

मुंबई :  चैत्यभूमीवर समीर वानखेडेंना विरोध करण्यात आल्याचं पहायला मिळालं. तसेच वानखेडेंच्या विरोधकांकडून घोषणाबाजीही करण्यात आली. मंत्री नवाब मलिक समीर वानखेडेंना मुस्लिम सांगून, त्यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात कोर्टात लढत आहेत. तर इकडे समीर वानखेडेंना चैत्यभूमीवर विरोधाचा सामना करावा लागला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी समीर वानखेडे येताच, त्यांच्याविरोधात भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

वानखेडे समर्थकांमध्ये आणि विरोधकांमध्ये तणाव

वानखेडे विरोधक आणि समर्थक यांच्यात हमरीतुमरी झाल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र विरोधकाकडे दुर्लक्ष करत, समीर वानखेडेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. विशेष म्हणजे यानंतर समीर वानखेडेंनी वंचित आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. यावेळी काही वेळ वानखेडे आणि आंबेडकरांनी जवळच बसून चर्चा केली. मात्र या दोघांची नेमकी काय चर्चा झाली हे समोर येऊ शकलेलं नाही. तर चैत्यभूमीवर येऊन ऊर्जा मिळते, त्यामुळं आपण इथं आल्याचं समीर वानखेडेंनी म्हटलंय.

नवाब मलिकांकडून वानखेडेंना पुन्हा चिमटा

नवाब मलिकांनी मात्र पुन्हा एकदा समीर वानखेडेंना चिमटा काढलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार स्वीकारुन कोणी नमन करत असेल तर त्याचं स्वागत आहे. जय भीम म्हणजे अन्यायाच्या विरोधातला लढा आहे. जय भीम इम्पॅक्ट झाला, त्यामुळं काही लोक इथं येत आहेत. समीर वानखेडे हे कधी चैत्यभूमीवर इतक्या वर्षात अभिवादन करण्यासाठी का आले नाही? हे मला माहिती नाही. पण ते माझ्यासोबत नमाज पठण करण्यासाठी नियमित यायचे, असं मलिक म्हणाले आहेत. समीर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावर नवाब मलिकांचा आक्षेप आहे. मुस्लिम धर्म स्वीकारला असतानाही, SCच्या जात प्रमाणपत्रावर नोकरी मिळवल्याचा आरोप मलिकांचा आहे. तर वानखेडे कुटुंबांनी मलिकांचे आरोप फेटाळून, लावत समीर वानखेडेंची जात महारच असल्याचं सांगत आहेत. मलिक आणि वानखेडे कुटुंबातली लढाई कोर्टात सुरु आहे..मात्र विरोधाचा सूर दादरमध्ये चैत्यभूमीवरही दिसला.

पत्नीचे अश्लील फोटो पतीला पाठवून पैसे मागणाऱ्या तरुणाला अटक, न्यायालयाकडून सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

St worker strike : एसटीच्या संपात उभी फूट, खासगी बस चालकांकडून प्रवाशांची लूट

RBI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील आता ‘या’ बँकेवर बंदी, ग्राहकांना फक्त 10 हजार काढता येणार