
गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ हा सध्या चांगलाच चर्चेत आलाय. दिलजीत दोसांझ याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

दिलजीत दोसांझ हा नुकताच अमेरिकन लेट नाईट शो 'द टुनाईट शो विथ जिमी फॅलन'मध्ये दिसला. आता त्याच्या या शोमधील काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

यावेळी दिलजीत दोसांझ हा कुर्ता, पंजाबी धोती आणि पगडीमध्ये दिसला. मात्र, यावेळी चर्चा होतंय ती म्हणजे दिलजीत दोसांझ याच्या घडीची.

दिलजीत दोसांझ याने डायमंडची घड्याळ घातलीये. दिलजीत दोसांझने ही घड्याळ खास जैन द ज्वेलर्सकडून तयार करून घेतलीये.

हैराण करणारे म्हणजे या घड्याळाची किंमत तब्बल 1.2 कोटी रुपये आहे. दिलजीत दोसांझ ही कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.