Raksha Bandhan 2025 : शतायुषी भावाला 100 वर्षांच्या बहिणीची राखी

आज राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधनचा दिवस. नात्यांची खरी किंमत काय असते, हे दाखवणारा एक अनोखा सोहळा अहिल्यानगर मध्ये पहायला. शतायुषी भावाला 100 वर्षांच्या बहिणीने प्रेमाने राखी बांधली.

| Updated on: Aug 09, 2025 | 2:43 PM
1 / 6
सध्याच्या युगात अनेक नाती कमकुवत होत असताना, नात्यांची खरी किंमत काय असते, हे दाखवणारा एक अनोखा सोहळा अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यात पाहायला मिळाला.

2 / 6
येथील जोगेश्वरी आखाडा येथे 100 वर्षांच्या बहिणीने आपल्या 104 वर्षांच्या भावाला राखी बांधून, रक्षाबंधन साजरं केलं.

3 / 6
जोगेश्वरी आखाडा येथील ह.भ.प. नारायण डौले (वय 104) आणि त्यांची धाकटी बहीण पार्वताबाई भुजाडी (वय 100) यांनी हा सोहळा साजरा केला.

4 / 6
या दोघांनीही वयाची शंभरी पार केली असली तरी, त्यांच्यातील भावा-बहिणीचे प्रेम आजही तितकेच घट्ट आहे.

5 / 6
पार्वताबाईंनी नारायण डौले यांना राखी बांधताना त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहण्यासारखे होते.सध्या सोशल मीडियावर या दोघांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

6 / 6
या शतायुषी रक्षाबंधनाने अनेक लोकांना भावूक केले असून त्यांच्यातील अतूट नात्याची चर्चा सर्वत्र होत आहे