
बारा एकरातील ऊसाचे नुकासान : सध्या ऊसाचे पाचट हे पूर्णपणे वाळलेले आहे. त्यामुळे एका फडातील आग ही अवघ्या काही क्षणात इतरत्र पसरत आहे. असाच प्रकार लुखामसला य़ेथे झाला आहे. गणेश देशमुख यांच्या ऊसाला लागलेली आग पुन्हा शिवरात पसरली आणि इतर शेतकऱ्यांचेही नुकसान झाले.

कारण मात्र अस्पष्ट : ऊसाला आग लागण्याचे कारण मात्र, अद्यापही स्पष्ट झालेले नाही. यापूर्वीची घटना ह्या शॉर्टसर्किटमुळे झाल्या आहेत. पण लुखामसला शिवारातील या घटेनेचे कारण स्पष्ट झालेले नाही. पण 12 एकरातील ऊस जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.

दाद मागावी कुणाकडे : घटनेचे कारणच स्पष्ट नसल्याने शेतकऱ्यांना काही हलचालही करता येत नाही. गेवराई तालुक्यात ऊसतोडणी शिल्लक आहे. त्यामुळे साखर कारखाना अशा अवस्थेतील ऊस घेतो का नाही याबाबत संभ्रमता आहे.

गेवराई तालुक्यातील लुखामसला शिवारातील 12 एकरातील ऊसाला आग लागल्याची घटना घडली आहे

आठवड्यातील दुसरी घटना : गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच अशा घटना घडत असल्याने झालेले नुकसान भरुनही काढता येत नाही. बीड जिल्ह्यामध्ये ऊसाचे क्षेत्र वाढत आहे. पण अशा दुर्देवी घटनांमुळे शेतकरी हताश होत आहे. ऊसाला आग लागण्याची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे.