ज्याची भीती तेच घडले, सराफा बाजारात मोठी खळबळ, सोन्याचा भाव थेट..
Today gold prices : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत चढउतार बघायला मिळत आहे. त्यातच आता सोन्याच्या भावात मोठा उलटफेर झाला. ज्यामुळे सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली.

मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये मोठे चढउतार सतत बघायला मिळत आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धानंतर सोने चांगलेच घसरले. सोन्याच्या भाव धाडकन कोसळले.
दिवाळीत सोन्याच्या भावात मोठी वाढ होईल, असा अंदाजा होता. मात्र, प्रत्यक्षात भाव अधिक घसरताना दिसले. आज 14 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली.
14 नोव्हेंबरच्या दरानुसार, 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅममागे 418 रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे चांदीच्या किंमतीत घट झाली असून चांदी प्रति किलो तब्बल 2666 रूपयांनी स्वस्त झाली.
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे. 14 नोव्हेंबर रोजी शुद्धतेच्या चांदीची किंमत प्रति किलो सुमारे 1,82,244 रुपये इतकी आहे. मागील बंद भावाच्या तुलनेत ही सुमारे 2,666 रुपयांची घट आहे.
सोने अधिक स्वस्त होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता पुन्हा सोने वधारताना दिसत आहे. सोन्याला पुन्हा भाव खाताना दिसत आहे. जर अमेरिकेने इराणवर हल्ला केला की, पुन्हा सोन्याच्या भावात घसरण दिसेल.