Photo : गाढव लेकाचे… एका रात्रीत 16 गाढवांची चोरी, अदृश्य वाहन आलं अन्….

गाय, बैल, म्हैस, शेळ्या किंवा कोंबड्या चोरीच्या घटना नेहमी ऐकायला मिळतात. मात्र पैठण शहरात एकाच रात्री तब्बल 16 गाढवांची चोरी झाल्याची घटना घडली असून, त्यामुळे गाढव मालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

| Updated on: Aug 06, 2026 | 7:19 PM
1 / 5
पैठण शहरात एकाच रात्री तब्बल 16 गाढवांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकारामुळे कुंभार समाजातील गाढव मालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी मध्यरात्री ही चोरी झाली असून, चोरट्यांच्या काही हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.

पैठण शहरात एकाच रात्री तब्बल 16 गाढवांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकारामुळे कुंभार समाजातील गाढव मालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी मध्यरात्री ही चोरी झाली असून, चोरट्यांच्या काही हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.

2 / 5

माती, वाळू आणि इतर बांधकाम साहित्याची वाहतूक करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुंभार समाजातील कुटुंबांची ही गाढवे चोरीला गेली आहेत. गाढवांचा शोध घेत असताना मालकांना तहसील रोड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्यामध्ये काही अज्ञात व्यक्ती आयशर प्रकारच्या मालवाहू वाहनात गाढवे भरताना दिसत आहेत.

3 / 5

मात्र, वाहन अंधारात असल्याने त्याचा क्रमांक स्पष्ट दिसत नसल्यामुळे चोरट्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. चोरी झालेल्या गाढवांमध्ये अंबादास छगन रोकडे यांची 5, रोहिदास सुभाष पंजावाले यांची 5, अक्षय सुभाष दिल्लीवाले यांची 3, विनोद बबन पंजावाले यांची 2 आणि अनिल भारत रोकडे यांचे 1 अशा एकूण 16 गाढवांचा समावेश आहे.

4 / 5

चोरी झालेल्या गाढवांची अंदाजे किंमत सुमारे 5 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधनच हिरावले गेले असून पोलिसांनी तातडीने तपास करून चोरट्यांचा शोध घ्यावा आणि चोरीला गेलेली गाढवे परत मिळवून द्यावीत अशी मागणी गाढव मालकांनी केली आहे.

5 / 5

या घटनेनंतर परिसरातील गाढव मालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी आपली गाढवे आता घरासमोरच बांधून ठेवण्यास सुरुवात केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us