लाखो चाहत्यांची आवडती ठरलेली रोमँटिक मालिका; एकदा पाहिल्यावर पुन्हा पाहण्याचा मोह आवरणार नाही
7.9 रेटिंग असणारी प्रचंड रोमँटिक मालिकी जिने लाखो प्रेक्षकांच्या मनावर केलं राज्य. 17 भागांमध्ये दाखवली प्रचंड सुंदर अशी लव्ह स्टोरी. आजही एकदा नाही अनेकदा बघत आहेत लोक.

गेल्या काही वर्षांत कोरियन, थाई आणि इतर आशियाई मालिकांची लोकप्रियता जगभरात झपाट्याने वाढली आहे. विशेषतः तरुण वर्गामध्ये या मालिकांना मोठी पसंती मिळत असून, प्रेम, मैत्री आणि कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित साध्या पण हृदयस्पर्शी कथा प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत.

अशाच लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे 'F4 थाईलैंड: बॉयज़ ओवर फ्लावर्स'. 18 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित झालेली ही मालिका 2022 पर्यंत प्रसारित झाली आणि आजही चाहत्यांच्या आवडीच्या यादीत कायम आहे.

या मालिकेची कथा एका साध्या कुटुंबातील मुलगी आणि श्रीमंत, प्रभावशाली विद्यार्थ्यांच्या गटाभोवती फिरते. कॉलेजमधील संघर्ष, सामाजिक विषमता आणि प्रेमाच्या गुंतागुंतीच्या नात्यांवर आधारित ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते. मालिकेतील लव्ह ट्रँगल आणि पात्रांच्या भावनिक प्रवासामुळे ती विशेष लोकप्रिय ठरली.

या मालिकेत एकूण 17 भाग असून प्रत्येक भागाचा कालावधी सुमारे 45 ते 60 मिनिटांचा आहे. प्रेक्षकांसह समीक्षकांनीही मालिकेचे कौतुक केले आहे. MyDramaList वर मालिकेला 8.5 तर IMDb वर 7.9 असे चांगले रेटिंग मिळाले आहे.

ही मालिका Rakuten Viki या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. काही देशांमध्ये ती Viu वरही पाहता येते. भारतात अधिकृत हिंदी डबिंग मर्यादित स्वरूपात उपलब्ध असले तरी यूट्यूबवर आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर यासंबंधीचे व्हिडिओ पाहायला मिळतात.