काश्मिरमध्ये शूट झालेलं प्रचंड रोमँटिक गाणं, 34 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय, आजही त्या गाण्याचे लाखो चाहते
90 च्या दशकातील काश्मिरच्या निसर्गरम्य वातावरणात शूट झालेलं प्रचंड रोमँटिक गाणं. 34 वर्षानंतरही प्रत्येक व्यक्तीचं आवडतं. गाण्यापेक्षा त्यामधील सीन ठरलेले लक्षवेधी.

हिंदी चित्रपटसृष्टीतील 90 चे दशक हे संगीताचा सुवर्णकाळ म्हणून ओळखले जाते. त्या काळातील गाणी केवळ चित्रपटांपुरती मर्यादित नव्हती तर रेडिओ, कॅसेट्स आणि प्रत्येक गल्लीबोळात घुमत असत. त्या काळातील गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत.

अशाच अजरामर गाण्यांपैकी एक म्हणजे ये हसीं वादियां. 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रोजा' या चित्रपटातील हे रोमँटिक गाणं आजही तितकेच लोकप्रिय आहे. हे गाणं प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम आणि के. एस. चित्रा यांनी गायले असून त्याला संगीत ए. आर. रहमान यांनी दिले आहे.

काश्मीरच्या निसर्गरम्य वातावरण आणि बर्फाच्छादित दऱ्यांमध्ये हे गाणं शूट करण्यात आलं. आपल्या अप्रतिम सीनमुळे ते अधिकच खास ठरलं. गाण्यात अरविंद स्वामी आणि मधू यांची निरागस आणि सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळते.

कोणत्याही भडक सादरीकरणाशिवाय केवळ नैसर्गिक सौंदर्य आणि मधुर संगीताच्या जोरावर हे गाणे प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले. गाणं प्रदर्शित होताच ते सुपरहिट ठरलं आणि आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट रोमँटिक गाण्यांमध्ये त्याची गणना केली जाते.

सोशल मीडिया आणि विविध म्युझिक प्लॅटफॉर्मवर हे गाणे आजही मोठ्या प्रमाणात ऐकले जाते. अवघ्या 3 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 12 कोटी रुपयांची कमाई करत मोठे यश मिळवले होते.