AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहन भागवत यांचे LGBTQ समाजाबाबत मोठे विधान, म्हणाले; ‘अशा प्रकारचे लोक…’

Mohan Bhagwat on LGBTQ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी LGBTQ समुदायाबाबत मोठे विधान केले आहे. यासोबत त्यांनी इतर लोकांना या समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याचे आवाहन केले आहे.

मोहन भागवत यांचे LGBTQ समाजाबाबत मोठे विधान, म्हणाले; 'अशा प्रकारचे लोक...'
mohan bhagwat on lgbtqImage Credit source: Google
| Updated on: Jul 26, 2026 | 11:25 PM
Share

LGBTQ समाजाकडे काही लोक हे हीन भावनेने पाहतात, ते समाजापासून वेगळे आहेत असा त्यांचा समज असतो. मात्र आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी LGBTQ समुदायाबाबत मोठे विधान केले आहे. ‘LGBTQ समुदायातील लोकही समाजाचाच एक भाग आहेत आणि त्यांना सन्मानाने तसेच समानतेने समाजात स्थान मिळाले पाहिजे. अशा प्रकारचे लोक आपल्या समाजातही आहेत. त्यापैकी काही जण जन्मतःच तसे असतात, अशा परिस्थितीत संबंधित व्यक्ती किंवा इतर कोणीही काही करू शकत नाही, कारण ते जन्मतःच तसे असतात असं भागवत यांनी म्हटलं आहे.

हैदराबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत म्हणाले की, ‘जेव्हा संपूर्ण जगात असे लोक आहेत, तेव्हा भारतात असे कधीच नव्हते असे म्हणता येणार नाही. आपल्या समाजातही असे लोक पूर्वीपासून आहेत आणि आपल्या परंपरेने त्यांच्या अस्तित्वाला मान्यता दिली आहे. काही प्रकरणांमध्ये बदल शक्य असू शकतो, मात्र जिथे तो शक्य नाही, तिथे हे समजून घेणे आवश्यक आहे की तेही माणसे आहेत आणि त्यांनाही सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे.**

भागवत यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘त्यांना समाजापासून वेगळे केले गेले नाही, उलट सामाजिक जीवनात त्यांच्यासाठीही स्थान राखले गेले आहे. त्यामुळे अशा व्यक्तींकडे हीनभावनेने पाहू नये. आजही या समुदायाचे स्वतःचे देव, धार्मिक स्थळे आणि महामंडलेश्वर आहेत. ते कुंभमेळ्यातही सहभागी होतात. या विषयावर अनावश्यक गदारोळ करण्याऐवजी आपल्या परंपरेत अशी व्यवस्था करण्यात आली की समाजाने त्यांच्याबद्दल सहानुभूती आणि स्वीकाराची भावना ठेवावी. त्यांना समाजापासून वेगळे न मानता समाजाचाच एक भाग म्हणून स्थान देण्यात आले.’

पालकांनी मुलांना समजून घ्यावे

मोहन भागवत यांनी नव्या पिढीबाबतही भाष्य केले आहे. आपल्याला नव्या पिढीत जे गुण आणि संस्कार पाहायचे आहेत, ते सर्वप्रथम आपण स्वतःच्या आचरणातून दाखवले पाहिजेत.मुलांना ओरडण्याऐवजी त्यांना समजून घ्यावे आणि प्रेमाने संवाद साधावा. मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवण्यासाठी त्यांच्याशी समजुतीने वागणे आवश्यक आहे. समाजात ज्या बदलाची आपण अपेक्षा करतो, त्याची सुरुवात सर्वप्रथम स्वतःपासून झाली पाहिजे असं आवाहन त्यांनी पालकांना केले आहे.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...