28 वर्षांपूर्वाचा कॉमेडी चित्रपट, हसून-हसून पोट दुखेल, चित्रपटातील गाणं तर प्रचंड हिट, आजही प्रेक्षक…

28 वर्षांपूर्वीचा कॉमेडी चित्रपट, इतका कॉमेडी की हसून-हसून पोट दुखेल.आजही प्रेक्षक बघण्यासाठी पुन्हा-पुन्हा करत आहेत गर्दी. चित्रपटापेक्षा गाणं ठरलं होतं प्रचंड हिट.

| Updated on: Mar 05, 2026 | 3:33 PM
1 / 6
90च्या दशकात बॉलिवूडमध्ये कॉमेडी चित्रपटांचा एक वेगळाच सुवर्णकाळ होता. त्या काळात अनेक चित्रपट हे फॅमिली एंटरटेनमेंटवर आधारित असायचे. हलकी-फुलकी कथा, मजेशीर प्रसंग, लक्षात राहणारी गाणी आणि कलाकारांची भन्नाट कॉमेडी यामुळे प्रेक्षक प्रचंड हसायचे.

2 / 6
अशा चित्रपटांसाठी चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी व्हायची. नंतर टीव्ही चॅनेल्सवरही ते चित्रपट दाखवले जात होता. म्हणूनच त्या काळातील अनेक कॉमेडी चित्रपट आजही लोक फक्त मनोरंजनासाठी आणि हसण्यासाठी पुन्हा आवडीने बघतात.

3 / 6
असाच एक भन्नाट कॉमेडी चित्रपट 1998 साली प्रदर्शित झाला. त्याचे नाव Aunty No. 1. हा चित्रपट आजही लोकांना खूप आवडतो. या चित्रपटात गोविंदा, रवीनासह अनेक दमदार कलाकार झळकले होते.

4 / 6
चित्रपटाची कथा गोपी (गोविंदा) या पात्राभोवती फिरते. गोपीला संध्या (रवीना टंडन) वर प्रेम होते, पण तिला प्रभावित करण्यासाठी तो स्वतःला श्रीमंत असल्याचे खोटे सांगतो. या सगळ्या गैरसमजांमुळे आणि गोंधळामुळेच चित्रपटातील खरी कॉमेडी निर्माण होते.

5 / 6
या चित्रपटातील गाणीही खूप लोकप्रिय झाली होती. या चित्रपटाचे बजेट आणि कमाईबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट सुमारे 3.75 ते 4 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने सुमारे 5 कोटी तर जगभरात 9 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती.

6 / 6
आजही टीव्हीवर किंवा यूट्यूबवर या चित्रपटाचे सीन आणि गाणी मोठ्या प्रमाणावर पाहिली जातात. हलकी-फुलकी कॉमेडी, धमाल संवाद आणि गोविंदाची भन्नाट अ‍ॅक्टिंग यामुळे Aunty No. 1 हा चित्रपट आजही लोकांना खळखळून हसवणारा क्लासिक कॉमेडी चित्रपट म्हणून ओळखला जातो.

Follow Us