
टीव्ही असो किंवा चित्रपट...चाइल्ड आर्टिस्ट म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्रीला आता नाव, पैसा, प्रसिद्ध मिळत आहे. आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय ती तर पूर्णपणे बदलून गेली आहे. कमाईच्या बाबतीत सर्वांना मागे टाकून पुढे निघून गेलीय. तिने बॉलिवूडमध्ये पाऊलही ठेवलय. दुसऱ्याच चित्रपटापासून ट्रोलर्सच्या निशाण्यावर सुद्धा आहे. त्यामागच कारण लीड कलाकार आहे.

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय तिचा जन्म 2001 साली झाला. वयाच्या 8 व्या वर्षापासून तिच्या करिअरची सुरुवात झाली. सर्वप्रथम ती डान्स शो डान्स इंडिया डान्समध्ये पोहोचली. त्यानंतर डान्सचे सुपरस्टार्स शो चा भाग बनली. अभिनयाचा डेब्यू मेरी मां शो मधून केला. त्यानंतर अनेक टीव्ही सीरियल्समध्ये काम केलं.

ही अभिनेत्री आता 23 वर्षांची आहे. अलादीन की जस्मिन बनून अवनीत कौरला प्रेम मिळालं. अनेक पॉप्युलर शो चा भाग असलेली अवनीत दीर्घकाळापासून टीव्हीपासून लांब आहे. तिचा सगळा फोकस वेब सीरीजवर आहे किंवा चित्रपटांवर. चाइल्ट आर्टिस्ट म्हणून ती अनेक चित्रपटांचा भाग होती.

अवनीत कौरने 2014 साली आलेल्या YRF चा चित्रपट 'मर्दानी' मध्ये काम केलेलं. 'टीकू वेड्स शेरू'मध्ये ती लीड रोलमध्ये होती. तिच्यासोबत लीड रोलमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी होता. या चित्रपटात तिचा नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत किसिंग सीन होता. त्यावरुन बराच वाद झाला. हा पिक्चर प्राइम वीडियोवर स्ट्रीम करण्यात आलेला.

फिल्म रिलीज झाली, त्यावेळी ती 21 वर्षांची होती. तिच्यापेक्षा वयाने 28 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत तिने दिलेला किसिंग सीन लोकांना आवडला नव्हता. पण तुम्हाला माहिती आहे की, अवनीतच नाव शुभमन गिलसोबतही जोडलं गेलय. ती त्याच्यासोबत दिसली होती. दोघांच्या डेटिंगची सुद्धा बातमी आलेली.