रस्त्यावर पेन विकले, 13 व्या वर्षी केला आत्महत्येचा प्रयत्न, आज आहे 277 कोटींचा मालक

रस्त्यावर पेन विकून गाणी म्हणून लोकांना आकर्षित करायचा हा अभिनेता, वयाच्या 13 व्या वर्षी केलेला आत्महत्या करण्याचा प्रयत्न. आज आहे 277 कोटींचा मालक.

| Updated on: May 05, 2026 | 12:44 PM
1 / 6
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांनी प्रचंड मेहनत करून इंडस्ट्रीमध्ये यश प्राप्त केलं आहे. असाच एक कलाकार ज्याने रस्त्यावर पेन विकून दिवस काढले. वयाच्या 13 व्या वर्षी केलेला आत्महत्याचा प्रयत्न.  आज तो 277 कोटींचा मालक आहे.

2 / 6
आज आम्ही तुम्हाला ज्या अभिनेत्याबद्दल सांगत आहोत, त्याने 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्याने आपल्या अप्रतिम अभिनय आणि भन्नाट कॉमेडीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले. 80-90 च्या दशकात ज्याच्याशिवाय बॉलिवूड चित्रपट अपूर्ण वाटायचे असा हा लोकप्रिय कॉमेडियन म्हणजे जॉनी लिव्हर.

3 / 6
जॉनी लिव्हरचा जन्म तेलुगू कुटुंबात झाला. त्याचे वडील हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये ऑपरेटर म्हणून काम करत होते. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे त्याला लहानपणापासूनच संघर्षाचा सामना करावा लागला.

4 / 6
मुंबईतील गर्दीच्या झोपडपट्टीत त्याचे कुटुंब राहत होते. रोजच्या गरजा भागवणेसुद्धा कठीण झाले होते. या परिस्थितीमुळे जॉनी लीव्हरला आंध्र एज्युकेशन सोसायटी इंग्लिश हाय स्कूलमध्ये सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शाळा सोडावी लागली.

5 / 6
लहान वयातच त्याने कुटुंबाचा आधार बनण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या रस्त्यांवर तो पेन विकत असत. पण त्याची खासियत म्हणजे तो फक्त पेन विकत नसत, तर लोकांचे मनोरंजनही करत. प्रसिद्ध हिंदी चित्रपट कलाकारांची नक्कल करणे, गाणी गाणे आणि नाच करणे यामुळे लोक त्याच्याकडे आकर्षित होत. याच मिमिक्रीमुळे त्याच्या कॉमेडी करिअरची पायाभरणी झाली.

6 / 6
वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी त्याला घरातील समस्यांमुळे मोठा मानसिक धक्का बसला. वडिलांच्या मद्यपानाच्या सवयीमुळे घरात सतत तणावाचे वातावरण होते. या परिस्थितीत त्याने एकदा आयुष्य संपवण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, शेवटच्या क्षणी आपल्या तीन बहिणींचा विचार करून त्याने तो निर्णय बदलला.

Follow Us