हे गाणं कितीही वेळा पाहिलं तर भरत नाही मन, चित्रपट बघताना अनेकजण रडतात

बॉलिवूड सोडा हॉलिवूडमधील 29 वर्षांपूर्वीच्या गाण्याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ. ज्यामध्ये हिरोचा होतो मृत्यू तर थंडीने थरथरत असते अभिनेत्री. गाणं पाहताना अनेकांच्या डोळ्यात येते पाणी.

| Updated on: Jul 31, 2026 | 1:37 PM
1 / 5
रोमँटिक गाण्यांचा विषय निघाला की हिंदी गाण्यांसोबतच इंग्रजीतील एक अजरामर गाणं हमखास आठवते, ते म्हणजे 'My Heart Will Go On'. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या टायटॅनिक चित्रपटातील हे गाणं आजही प्रेम, विरह आणि भावनांचे प्रतीक मानले जाते.

2 / 5
या गाण्याने अनेक पिढ्यांना प्रेमाचा खरा अर्थ शिकवला. चित्रपटात नायक जॅकचा मृत्यू आणि त्यानंतर रोजचे एकाकी आयुष्य प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणते. त्यामुळे हे गाणं केवळ रोमँटिक नसून, विरह आणि अमर प्रेमाची भावनिक कहाणी सांगणारे ठरते.

3 / 5
1912 मध्ये बुडालेल्या आरएमएस टायटॅनिक जहाजाच्या सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात इतिहास आणि काल्पनिक प्रेमकथा यांची प्रभावी मांडणी करण्यात आली आहे.

4 / 5
चित्रपटात Leonardo DiCaprio यांनी गरीब, मनमोकळ्या स्वभावाचा जॅक डॉसनची भूमिका साकारली आहे. पोकरच्या खेळात टायटॅनिकचे तिकीट जिंकून तो प्रवासाला निघतो आणि जहाजावर त्याची भेट श्रीमंत घरातील रोजशी होते. Kate Winslet यांनी रोज डेविट बुकेटरची भूमिका साकारली आहे.

5 / 5
आजही 'My Heart Will Go On' हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि भावस्पर्शी प्रेमगीतांपैकी एक मानले जाते. प्रेम, त्याग आणि आठवणींची ताकद अधोरेखित करणारे हे गाणं आणि टायटॅनिकची कथा प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरली गेली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us