30 वर्षांपूर्वीचं ‘सुहागरात’चं गाणं! ना अश्लील शब्द ना किसिंग सीन, पण मनात तिच भावना, आजही चर्चेत
बॉलिवूडमधील 30 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले एक गाणे आहे जे आजही चर्चेत आहे. हे गाणे सुहागरातीवर चित्रीत करण्यात आले होते. पण कोणाताही बोल्ड सीन नाही, किसिंग सीन नाही तरी देखील या गाण्याने अनेकांची मने जिंकली आहे.

सुहागरात्रीचे चित्र आपल्या मनात सहसा फुलांनी सजलेला पलंग, त्याच्या शेजारी दुधाचा ग्लास, नवऱ्याची वाट पाहत बसलेली लाजरी नवरी आणि हळूच दार उघडून आत येणारा नवरदेव असे असते. हे दृश्य चित्रपटांमधून आपल्या डोळ्यांसमोर वारंवार येत असते. मात्र खऱ्या आयुष्यात हा क्षण त्या दृश्यापेक्षा खूप गहन आणि भावपूर्ण असतो.
नवविवाहित जोडप्यासाठी सुहागरात हा केवळ शारीरिक जवळीकीचा क्षण नसतो, तर एकमेकांना समजून घेण्याचा, एकमेकांच्या नजरेत स्वतःला शोधण्याचा आणि नवीन नात्याच्या उंबरठ्यावर उभे राहण्याचा अत्यंत संवेदनशील अनुभव असतो. विशेषतः नवरीच्या मनात त्यावेळी एक अवर्णनीय घालमेल असते – लाज, उत्सुकता, आनंद आणि हळवा संकोच यांचा अनोखा संगम. या भावनांचे वर्णन करणे अनेकदा शब्दांच्याही पलीकडे जाते.
सुमारे तीस वर्षांपूर्वी आलेल्या एका गाण्याने हीच भावपूर्ण अवस्था कोणत्याही अश्लीलतेच्या स्पर्शाशिवाय अप्रतिम रीतीने साकारली होती. ते गाणे ऐकताच आजही नवविवाहित जोडप्यांमधील तीच निरागसता, संकोच आणि हळवे रोमान्स डोळ्यांसमोर उभे राहते.
गीतकार गुलजार यांच्या प्रतीकात्मक आणि संयमित शब्दांनी एका नववधूच्या अंतर्मनातील भावना अत्यंत कलात्मकपणे गुंफल्या आहेत. ए.आर. रहमान यांचे जादुई संगीत आणि लता मंगेशकर यांचा मधुर आवाज याला अजरामर बनवतो. गाण्यात येणारा मल्याळम कोरस त्या अनुभवाची गहनता आणखी वाढवतो.
आम्ही मणिरत्नम दिग्दर्शित ‘दिल से’ चित्रपटातील ‘जिया जले’ या गाण्याविषयी बोलत आहोत. शाहरुख खान आणि प्रीती झिंटा यांच्यावर चित्रित झालेले हे गीत त्यांच्या केमिस्ट्रीमुळे आणि सुंदर लोकेशन्समुळे आयकॉनिक ठरले. तीन दशके उलटून गेली तरी या गाण्यातील ताजेपणा आणि भावुकता तशीच कायम आहे.
आजही अनेक प्रेमगीते येत असली तरी, सुहागरात्रीच्या निरागस संकोचाला आणि अव्यक्त प्रेमाला इतक्या सभ्य आणि काव्यात्मक रीतीने सादर करणारे दुसरे गाणे सहजासहजी सापडत नाही. म्हणूनच ‘जिया जले’ आजही अनेकांच्या हृदयात पहिल्या प्रेमाची गोड आठवण बनून जिवंत आहे.