
MG Windsor EV ही ईव्ही नेमकीच भारतात लाँच झाली. कंपनीच्या दाव्यानुसार एकदा चार्ज झाल्यावर ही कार 331 किलोमीटर धावते. या कारची एक्स शोरूम किंमत 14.34 लाख रुपये आहे.

Tata Tigor EV ही इलेक्ट्रिक कार मायलेजमध्ये जोरदार आहे. ही ईव्ही चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 26kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. या ईव्हीचे मायलेज 315 किलोमीटर आहे. या एक्स शोरुमची किंमत 12.49 लाख रुपये आहे.

Tata Nexon EV ही कार पण तिच्या मायलेजसाठी नावाजली आहे. या ईव्हीची बॅटरी दोन रेंजमध्ये येते. पहिली कार 45kWh आणि दुसरी 30kWh ची आहे. 30kWh बॅटरीची ईव्ही 325 किलोमीटरचे मायलेज देते. तर 45 Kwh बॅटरीची ईव्ही 489 किलोमीटरचे मायलेज देते. या ईव्हीची एक्स शोरूम किंमत 12.49 लाख रुपये आहे.

Tata Punch EV ही अजून एक दमदार कार आहे. या ईव्हीच्या 25 किलोवॅट बॅटरी व्हेरिएंटचे मायलेज 315 किलोमीटर आहे. 35 किलोवॅट बॅटरी पॅकचा व्हेरिएंटचा मायलेज 421 किलोमीटर आहे. या ईव्हीची सुरूवातीची एक्स शोरूम किंमत 9.99 लाख रुपये आहे.

MG ZS EV 20 लाखाची पहिली कम्पॅक्ट एसयुव्ही आहे. 50.3kWh बॅटरीसह मार्केटमध्ये येते. एकदा चार्ज केल्यावर ही कार 461 किलोमीटर धावते. या ईव्ही कारची सुरूवातीची एक्स शोरूम किंमत 18.98 लाख रुपये आहे.