
Tata Punch : टाटा पंच ही सध्या भारतातील सर्वात लोकप्रिय मायक्रो-SUV आहे. तिचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे 5-स्टार ग्लोबल NCAP सेफ्टी रेटिंग आणि हाय ग्राउंड क्लीयरन्स, ज्यामुळे ती खराब रस्त्यांसाठी उत्तम पर्याय ठरते. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.60 लाखांपासून सुरू होते.

Maruti Suzuki Swift : नवीन स्विफ्ट तिच्या स्पोर्टी लूक आणि हाय मायलेजमुळे तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. 2026 मॉडेलमध्ये कंपनीने इंजिन अधिक रिफाइंड केले आहे, ज्यामुळे मायलेज 24-25 kmpl पर्यंत पोहोचते. तिची एक्स-शोरूम किंमत 5.78 लाखांपासून सुरू होते.

Hyundai Exter : तुम्हाला कारमध्ये सनरूफ, डॅशकॅम आणि अनेक स्मार्ट फीचर्स हवे असतील, तर हुंडई एक्सटर हा उत्तम पर्याय आहे. सेफ्टीसाठी कंपनी सर्व व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग्स देते. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.74 लाखांपासून सुरू होते.

Nissan Gravite : निसानने अलीकडेच ग्रेविट लॉन्च केली आहे, जी मि़डल क्लास कुटुंबासाठी आधुनिक डिझाइन आणि प्रीमियम इंटीरियरसह येते. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.65 लाखांपासून सुरू होते. कॉम्पॅक्ट साईज असूनही आतमध्ये चांगली जागा मिळते.

Baleno : बलेनो तिच्या प्रीमियम लूक आणि प्रशस्त केबिनसाठी ओळखली जाते. या कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा आणि हेड्स-अप डिस्प्ले (HUD) सारखी आधुनिक फीचर्स मिळतात. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाखांपासून सुरू होते.