IND vs IRE : आयर्लंडकडून हरलो ते हरलो, वर टीम इंडियाने मॅचमध्ये बनवले पाच लाजिरवाणे रेकॉर्ड

IND vs IRE 1st T20i : आयर्लंडने T20 सीरीजच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 34 धावांनी पराभव केला. सिविल सर्विस क्रिकेट क्लबच्या मैदानावर हा सामना झाला. 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाचा डाव 18.5 ओव्हरमध्ये 148 धावांवर आटोपला. या मॅचमध्ये भारतीय खेळाडूंनी अनेक लाजिरवाणे रेकॉर्ड बनवले.

| Updated on: Jun 27, 2026 | 8:30 AM
1 / 5
भारतीय क्रिकेट टीमचा आयर्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा पहिला पराभव आहे. याआधी खेळलेल्या सर्वच्या सर्व 11 सामन्यात भारताने विजय मिळवला होता. 2007 साली दोन्ही टीम्समध्ये पहिला सामना झाला होता. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारताला हरवणारा आयर्लंड 11 वा संघ बनला आहे. (PC-GETTY IMAGES)

2 / 5
 सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय टीमचा पहिल्याच सामन्यात पराभव झाला आहे. 2024 मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताने झिम्बाब्वेचा दौरा केला होती. तिथे सुद्धा पहिल्याच सामन्यात पराभव झाला होता.  (PC-GETTY IMAGES)

3 / 5
प्रसिद्ध कृष्णाने चार ओव्हरमध्ये 57 धावा दिल्या. भारताकडून याआधी खेळलेल्या t20 इंटरनॅशनल सामन्यात त्याने 68 धावा दिल्या होत्या. प्रसिद्ध कृष्णा सलग दोन टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक 125 धावा देणारा बॉलर बनला आहे. (PC-GETTY IMAGES)

4 / 5
प्रसिद्ध कृष्णाच्या 17 व्या ओव्हरमध्ये आयरिश फलंदाजांनी 27 धावा चोपल्या. गॅरेथ डेलनीने त्याला सलग तीन सिक्स मारले. प्रसिद्ध आयर्लंड विरुद्ध T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक महागडी ओव्हर टाकणारा गोलंदाज बनला आहे. (PC-GETTY IMAGES)

5 / 5
टीम इंडियाचा t20 कॅप्टन म्हणून श्रेयस अय्यरचा हा पहिलाच सामना होता. या फॉर्मेटमध्ये पहिलाच सामना हरणारा तो चौथा भारतीय कर्णधार बनला आहे. विराट कोहली, ऋषभ पंत आणि शुबमन गिल सुद्धा याच लिस्टमध्ये आहेत. (PC-GETTY IMAGES)

Follow Us