
मुंबईत दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 29 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री एक मोठा फॅशन इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. जिथे अनेक बॉलिवूड स्टार्सनी रॅम्प वॉक केला. सनी लिओनी पासून ते मलायका अरोरापर्यंत अनेक अभिनेत्रींनी रॅम्पवर आपली ग्लॅमरस झलक दाखवली. त्यात जर सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं असेल तर ती मलायका अरोरा होती. मलायकाचा लूक अन् तिची स्टाईल ही अतिशय वेगळी आणि हटके होती.

मलायका अरोराने रॅम्पवर तिचा फॅशन सेन्स दाखवला. तिने लाल रंगाचा आउटफिट घातला होता. त्यावर तिने त्याच रंगाचे श्रग घातले होते. हाय हिल्सही घातले होते. मलायकाच्या ड्रेसमध्ये साईड-कट होता, तसेच तिने डोक्यावर ज्यामध्ये तिने गोल्डन शिमरी असा फुलां टियारा घातला आहे. ज्यामुळे तिचा लूक उठून दिसत आहे आणि पूर्ण होतोय.

मलायकानंतर सनी लिओनी देखील या शोमध्ये सहभागी होती. तिचाही ग्लॅमरस अंदाज हा प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारा होता. ती देखील गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये रॅम्पवर दिसली. तिचा लूक, मेकअप आणि स्टायलिश हेअरस्टाईलने ती फारच सुंदर दिसत होती. सनी लिओनीने तिच्या फॅशन स्टेटमेंटने रॅम्पवर सर्वांनाच प्रभावित केले, तिने सिल्व्हर टॉप आणि गुलाबी स्कर्ट परिधान केला आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

बिग बॉस १९ ची स्पर्धक नेहल चुडासमा देखील या कार्यक्रमाला उपस्थित होती, ती खूपच स्टायलिश दिसत होती. नेहलने चांदीच्या टॉपसह एक छोटा गुलाबी स्कर्ट घातला होता. तिने केस मोकळे सोडले होते अन् न्यूड मेकअपने तिचा लूक पूर्ण केला होता.

या शोमध्ये सर्वच अभिनेत्री सुंदर अन् ग्लॅमरस दिसत होत्या पण मलायका अरोरा नेहमी प्रमाणे तिच्या हटके अन् सुदंर लूक, ड्रेसने सर्वांवर भारी पडली.