हेमा मालिनी नाही तर ही अभिनेत्री होती शोलेची खरी बसंती, 50 वर्षानंतर कशी दिसते? फोटो पाहून बसणार नाही विश्वास

हेमा मालिनी नाही तर ही अभिनेत्री होती 'शोले'ची खरी बसंती, आता झाली आहे 75 वर्षांची. 50 वर्षांनंतर कशी दिसते?

| Updated on: Mar 18, 2026 | 1:20 PM
1 / 6
हिंदी चित्रपटसृष्टीतील 'शोले' या ऐतिहासिक चित्रपटाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट1975 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रम केले आणि आजही तो प्रेक्षकांच्या मनात तितकाच जिवंत आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील 'शोले' या ऐतिहासिक चित्रपटाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट1975 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रम केले आणि आजही तो प्रेक्षकांच्या मनात तितकाच जिवंत आहे.

2 / 6

रमेश सिप्पी दिग्दर्शित या चित्रपटात धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, जया बच्चन, अमजद खान आणि संजीव कुमार यांसारख्या दिग्गज कलाकारांनी काम केले. जय-वीरूची मैत्री, गब्बर सिंगचा खौफ आणि बसंतीचा हटके स्वभाव आजही प्रेक्षकांना आठवतो.

3 / 6

मात्र, चित्रपटातील बसंतीच्या काही धोकादायक स्टंट्स प्रत्यक्षात हेमा मालिनी यांनी केले नाहीत. हे स्टंट्स हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्टंटवुमन रेशमा पाठक यांनी केले होते. त्या पडद्यावर दिसल्या नाहीत पण बसंतीच्या प्रत्येक कठीण सीनमागे त्यांचेच धाडस होते.

4 / 6

रेशमा पाठक यांनी केवळ ‘शोले’ नाही तर मीना कुमारी, डिंपल कपाड़िया, श्रीदेवी आणि रेखा यांसारख्या अभिनेत्रींसाठीही त्यांनी काम केले. 1968 मध्ये त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली आणि अत्यंत कठीण परिस्थितीतही कुटुंबासाठी काम करत राहिल्या.

5 / 6

त्यांच्या आयुष्यावर 2019 मध्ये 'द शोले गर्ल' हा चित्रपटही तयार झाला,.ज्यातून त्यांच्या संघर्षाची आणि धाडसाची कहाणी मांडण्यात आली.

6 / 6

‘शोले’मधील बसंती ही केवळ हेमा मालिनी नाही तर तिच्यामागे रेशमा पाठक यांचेही मोठे योगदान होते. त्यामुळे त्या खऱ्या अर्थाने हिंदी सिनेमातील ‘स्टंट क्वीन’ म्हणून ओळखल्या जातात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us