ऐकताच मनाला सुकून देणारं गाणं, 50 वर्षांनंतरही थेट हृदयाला भिडतं, आजही लोक ऐकून…

4 मिनिट 20 सेकंदाचं सर्वात सुंदर गाणं, जे ऐकताच मनाला मिळतो मोठा सुकून. मनात उतरतात प्रत्येक शब्द, 50 वर्षानंतरही लोक ऐकताच गुनगुनतात.

| Updated on: May 04, 2026 | 3:11 PM
1 / 6
भारतीय चित्रपटसृष्टीत साधेपणा, गोड धून आणि मनाला थेट स्पर्श करणाऱ्या गाण्यांना नेहमीच विशेष स्थान मिळाले आहे. ही गाणी मोठ्या बीट्स किंवा जोरदार संगीतावर आधारित नसतात तर भावनांच्या ताकदीवर श्रोत्यांशी जोडली जातात.

भारतीय चित्रपटसृष्टीत साधेपणा, गोड धून आणि मनाला थेट स्पर्श करणाऱ्या गाण्यांना नेहमीच विशेष स्थान मिळाले आहे. ही गाणी मोठ्या बीट्स किंवा जोरदार संगीतावर आधारित नसतात तर भावनांच्या ताकदीवर श्रोत्यांशी जोडली जातात.

2 / 6

गावाकडचं वातावरण, मोकळं आकाश, नात्यांमधील ऊब आणि साधी जीवनशैली हे सगळं अशा गाण्यांमध्ये जिवंतपणे उमटतं. म्हणूनच ही गाणी फक्त ऐकली जात नाहीत तर ती अनुभवली जातात. अशाच एका गाण्याने तब्बल 50 वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि आजही त्याचं आकर्षण कायम आहे.

3 / 6

70 च्या दशकात हिंदी चित्रपटसंगीताचा एक वेगळाच जादूई काळ होता. त्या काळात गाणी ही फक्त चित्रपटाचा भाग नव्हती, तर कथानक पुढे नेण्याचं महत्त्वाचं माध्यम होती. प्रत्येक शब्द विचारपूर्वक लिहिला जायचा आणि प्रत्येक धून मनाला शांतता देणारी असायची.

4 / 6

आज आपण अशाच एका अजरामर गाण्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने काळाच्या पलीकडे जाऊन श्रोत्यांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली आहे. लांबच्या प्रवासात किंवा एकांतात हे गाणं ऐकलं, की त्याचे शब्द थेट मनाला भिडतात आणि एक वेगळाच सुकून मिळतो.

5 / 6

Gori Tera Gaon Bada Pyara हे गाणं 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या चितचोर या चित्रपटातील आहे. गाण्यात गावाचं सौंदर्य, निसर्ग आणि साधं आयुष्य अतिशय सुंदरपणे दाखवण्यात आलं आहे. दृश्य इतकी नैसर्गिक वाटतात की पाहणारा स्वतःला त्या वातावरणात हरवून बसतो.

6 / 6

हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर त्या काळात रेडिओवर प्रचंड गाजलं आणि लोकांच्या ओठांवर रेंगाळलं. आजही युट्यूबवर या गाण्याचे विविध व्हर्जन मिळून कोट्यवधी व्ह्यूज आहेत, ज्यातून त्याची लोकप्रियता स्पष्ट होते. नव्या पिढीलाही हे गाणं तितकंच भावतं आणि जुन्या काळाचा सुकून अनुभवायला मिळतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us