AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित आगरकर यांचे पद धोक्यात, बीसीसीआयकडून कठोर निर्णय, थेट मोठ्या बदलाची..

भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. बीसीसीआयकडून मोठा निर्णय घेण्यात आला. मागील काही दिवसांपासून संघाची कामगिरी म्हणावी तशी समाधानकारक नाही. त्यातच आता बदल्याबद्दल माहिती मिळतंय.

अजित आगरकर यांचे पद धोक्यात, बीसीसीआयकडून कठोर निर्णय, थेट मोठ्या बदलाची..
Ajit Agarkar
| Updated on: Aug 05, 2026 | 9:50 AM
Share

भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांचा कार्यकाळ पुढच्या महिन्यात संपत आहे. यादरम्यानच हालचालींना वेग आला. मोठे फेरबदलाचे संकेत आहेत. सप्टेंबर महिन्यात अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपत आहे. कार्यकाळ संपत असला तरीही त्यांना आता मुदत मिळणार नसल्याचे कळतंय. आगरकर यांचा कार्यकाळ 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत वाढवला जाणार नाही. तीन महिन्यांसाठी अजित आगरकर यांचा कार्यकाळ बीसीसीआयने वाढवला होता. मात्र, आता सप्टेंबर महिन्यात करार संपणार आहे. आता प्रश्न उपस्थित होतो की, अखेर अजित आगरकर यांची जागा नक्की कोण घेणार? मिळालेल्या माहितीनुसार, याकरिता पर्यायही बीसीसीआयला मिळाला आहे. एका मोठ्या चेहऱ्याकडे ही जबाबदारी दिली जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, भारताचे माजी दिग्गज फलंदाज व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपवली जाणार आहे. आगरकर यांचा कार्यकाळ जून 2026 मध्ये संपणार होता. बीसीसीआयने त्यांचा करार तीन महिन्यांकरिता पुढे ढकलला. 2027 च्या विश्वचषकापर्यंत आणखी त्यांचा कार्यकाळ वाढवणार असल्याची चर्चा होती.

पण आता येणाऱ्या माहितीनुसार, ही शक्यता आता कमी आहे. आता ही जबाबदारी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्यावर असणार आहे. अजित आगरकर यांच्या निवड समितीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या कामगिरीचा विचार केला असता संघाने ती प्रमुख स्पर्धा आपल्या नावावर केल्या. टी 20, एक चॅम्पियन्स ट्रॉफीचा यात समावेश आहे. मात्र, असे असले तरीही आता अजित आगरकर यांचा कार्यकाळ वाढणार नाही. अजित आगकर यांचा कार्यकाळ पुन्हा वाढवण्याचा विचार बीसीसीआयने सोडून दिला.

रिपोर्टनुसार, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्याकडे ही धुरा असणार आहे. याबाबत अजून घोषणा होणे बाकी आहे. मात्र, बीसीसीआकडून व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे कळतंय. पुढील काही दिवसात महत्वाचे सामने होणार आहेत. ज्यामुळे व्ही.व्ही.एस. लक्ष्मण  यांच्यावर महत्वाची जबाबदारी असेल. गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी म्हणावी तशी चांगली राहिली नाहीत. कसोटी, वन डे आणि टी20 मध्ये संघ समाधारकारक कामगिरी करू शकला नाही.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी