57 वर्षांपासून हे गाणं प्रेक्षकांच्या मोबाईलमध्ये, ऐकताच लोक होतात रोमँटिक, आजही यूट्यूबवर बघतात लोक

57 वर्षांपूर्वीचं 5 मिनिट 54 सेकंदाचं रोमँटिक गाणं, आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे हे गाणं. यूट्यूबवर प्रेक्षक पुन्हा -पुन्हा ऐकत आहेत.

| Updated on: May 14, 2026 | 11:51 AM
1 / 5
भारतीय चित्रपटसृष्टीतील 60 आणि 70 चे दशक हे संगीताच्या सुवर्णकाळापैकी एक मानले जाते. त्या काळातील रोमँटिक गाणी आजही रसिकांच्या हृदयात जिवंत आहेत. त्या काळात चित्रपटांची ओळख फक्त कलाकार, कथा किंवा दिग्दर्शकांमुळे होत नव्हती तर गाण्यांमुळेही चित्रपट लोकप्रिय ठरत होते.

2 / 5
अनेकदा चित्रपटापेक्षा त्यातील गाणी अधिक गाजत आणि वर्षानुवर्षे लोकांच्या ओठांवर राहायची. आजही जुनी गाणी ऐकताना अनेक जण आठवणींच्या दुनियेत हरवून जातात. म्हणूनच 60 आणि 70 च्या दशकातील रोमँटिक गाण्यांची लोकप्रियता आजही तितकीच कायम आहे.

3 / 5
अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे ‘बिंदिया चमकेगी चूड़ी खनकेगी’. हे गाणे 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दो रास्ते' या चित्रपटातील आहे. या गाण्याला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या मधुर आवाजाने सजवले होते.

4 / 5
‘बिंदिया चमकेगी चूड़ी खनकेगी’ हे गाणे त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय प्रेमगीतांपैकी एक मानले जाते. गाण्यात प्रेम, नात्यांमधील गोडवा आणि भारतीय कुटुंबव्यवस्थेतील भावना अतिशय सुंदर पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत.

5 / 5
गाण्याची मधुर चाल आणि सहज लक्षात राहणारे बोल यामुळे हे गाणे प्रदर्शित होताच सुपरहिट ठरले होते. त्या काळात रेडिओवर हे गाणे सतत ऐकायला मिळत असे आणि आजही सोशल मीडियावर तसेच विविध म्युझिक प्लॅटफॉर्मवर हे गीत लोकप्रिय आहे.

Follow Us