दोन बहिणींचा भयानक खेळ! लोकांना मारून अंगणात पुरायच्या, 450 दिवसांपासून ट्रेंड करतेय ही सीरिज

खऱ्या घटनेवर आधारित असणारी अत्यंत भयावह आणि क्राइम सीरिज. जी बघताना देखील अंगावर येतो काटा. 2025 पासून Netflix वर करत आहे ट्रेंड.

| Updated on: Mar 27, 2026 | 1:15 PM
1 / 5
गेल्या काही वर्षांत गुन्ह्यांवर आधारित अनेक सीरीज आणि डॉक्युमेंट्रींचा ट्रेंड झपाट्याने वाढताना दिसला. यामध्ये काही कथा ह्या खऱ्या घटनेवर आधारित असल्यामुले त्यांनी प्रेक्षकांचे केवळ मनोरंजन केले नाही तर त्यांना विचार करायलाही भाग पाडले.

गेल्या काही वर्षांत गुन्ह्यांवर आधारित अनेक सीरीज आणि डॉक्युमेंट्रींचा ट्रेंड झपाट्याने वाढताना दिसला. यामध्ये काही कथा ह्या खऱ्या घटनेवर आधारित असल्यामुले त्यांनी प्रेक्षकांचे केवळ मनोरंजन केले नाही तर त्यांना विचार करायलाही भाग पाडले.

2 / 5

अशाच एका धक्कादायक आणि भयावह कथेनं ओटीटीवर सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही कथा दोन बहिणींची आहे. ज्या एकामागून एक लोकांची हत्या करत आणि त्यांना घराच्या अंगणात पुरत असतं. या सीरिजमध्ये एकूण 91 लोकांच्या मृत्यूमागचं भयानक सत्य उलगडतं जे कोणाच्याही अंगावर काटा आणेल.

3 / 5

‘The Dead Girls’ ही मेक्सिकन क्राइम-ड्रामा वेब सीरीज 10 सप्टेंबर 2025 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. या सीरिजची कथा दोन ‘बालाद्रो सिस्टर्स’भोवती फिरते, ज्या सुरुवातीला एक बार चालवत होत्या. पुढे त्यांनी वेश्याव्यवसाय सुरू केला आणि त्यासाठी लहान मुली व तरुणींना खरेदी करून त्यांचा वापर केला.

4 / 5

हळूहळू त्यांच्या आसपासच्या मुली आणि काही लोक गायब होऊ लागतात. एका मुलीच्या हत्येनंतर या भयानक घटनांची साखळी उलगडायला सुरुवात होते. ही सीरिज प्रत्यक्षात ‘लास मुएर्टास’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या खऱ्या घटनेवर आधारित आहे.

5 / 5

‘The Dead Girls’ या सीरिजला प्रदर्शनानंतर प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या सीरिजचे एकूण 6 भाग असून प्रत्येक भाग सुमारे एक तासाचा आहे. IMDb वर या मालिकेला 6.9 इतकी रेटिंग मिळाली आहे. ही सीरिज Netflix वर हिंदी भाषेत उपलब्ध आहे आणि 2025 पासून ती ट्रेंडमध्ये आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us