ऑफिसला जाताना नाश्ता बनवायला वेळच नाही ? हे 6 झटपट पदार्थ करा ट्राय, प्रोटीनही मिळेल भरपूर
सकाळी ऑफिसला जाण्याच्या घाईत अनेकजण नाश्ता टाळतात किंवा चहा-बिस्किटांवर भागवतात. बेसन टोस्ट, पनीर पराठा आणि मूगडाळ चिलासारखे पदार्थ कमी वेळात तयार करता येतात.

सकाळी ऑफिसला जाण्याची घाई,टिफिनची तयारी आणि त्यात नाश्ता बनवण्याचा कंटाळा! अशा वेळी अनेकजण नाश्ता टाळतात किंवा चहा- बिस्किटांवर वेळ मारून नेतात. पण या झटपट होणाऱ्या पदार्थांमुळे आता ती वेळ तुमच्यावर येणार नाही
बेसन टोस्ट :बेसनात मीठ, हळद, तिखट, ओवा, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून घट्ट मिश्रण तयार करा.त्यात ब्रेड बुडवून तव्यावर भाजा. नाश्ता झाला तयार
ओट्स,शेंगदाणे आणि फळं : रात्री ओट्स दुधात भिजवून ठेवा. त्यातच चिया बिया, केळं , सफरचंद,थोडे शेंगदाणे घालून नाश्ता तयार करा. गोडवा हवा असल्यास त्यात थोडा मध किंवा पीनट बटर वापरा
मोड आलेल्या कडधान्यांची कोशिंबीर :मोड आलेल्या कडधान्यात काकडी, टोमॅटो,गाजर, कांदा, हिरवी मिरची आणि लिंबाचा रस घाला.प्रथिनांसोबतच प्रोटीनही मिळेल
बेसन आणि मूगडाळीचा चिला :भिजवलेली मूगडाळ वाटून घ्या.त्यात थोडं बेसन मिसळा. मीठ, तिखट आणि बारीक चिरलेला कांदा घाला. हे मिश्रण तव्यावर डोश्याप्रमाणे पसरवा खरपूस भाजा.
पनीर पराठा :पनीर कुस्करून त्यात मीठ,चाट मसाला आणि धणे- जिऱ्याची पूड मिसळा. कणकेच्या गोळ्यात भरून पराठा लाटून घ्या. तव्यावर खरपूस भाजा. पटकन होणारा नाश्ताने पोटभरून जाईल.
अंड आणि ब्रेड :बेसन टोस्टसाठी जे पदार्थ केले ते सेम वापरून त्यात अंड मिसळलं तर छान आमलेट ब्रेड तयार होईल.