
सतीचे मंदिर हे हिंदू मंदिर पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील हिंगोल नदी आणि हिंगोल राष्ट्रीय उद्यानाच्या दरम्यान आहे. हे मंदिरं प्रसिद्ध शक्तीपीठांमध्ये गणले जातात, जे माता सतीशी संबंधित आहेत. असे म्हटले जाते की जेव्हा देवी सती हवनकुंडाच्या अग्नीत त्यांनी स्वत:च्या शरीराचा त्याग केला होता तेव्हा भगवान शिवाने त्यांच्या शरीराला उचलले आणि तांडव करण्यास सुरुवात केली. त्याच काळात माता सतीचे शीर याच ठिकाणी पडले होते अशी आख्यायिका सांगितली जाते. हे मंदिर टेकड्यांच्या मध्ये असलेल्या एका गुहेत बांधलेले आहे.

राम मंदिर अयोध्येच्या राम मंदिराबद्दल संपूर्ण जगाला माहिती आहे. पण पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादजवळील सय्यदपूरमध्ये देखील एक राम मंदिर आहे. हे मंदिर राजा मानसिंग यांनी 1580 मध्ये बांधले होते, जे खूप लोकप्रिय आहे.

राम मंदिर अयोध्येच्या राम मंदिराबद्दल संपूर्ण जगाला माहिती आहे. पण पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादजवळील सय्यदपूरमध्ये देखील एक राम मंदिर आहे. हे मंदिर राजा मानसिंग यांनी 1580 मध्ये बांधले होते, जे खूप लोकप्रिय आहे.

पंचमुखी हनुमानजींचे मंदिर देशभरात अनेक ठिकाणी तुम्हाला पंचमुखी हनुमानजींचे मंदिर आढळेल. पण आम्ही तुम्हाला सांगतो की पाकिस्तानातील कराचीमध्ये एक प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिर देखील आहे. येथे अनेक भाविक दर्शनासाठी येतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण हे मंदिर 1500 वर्षे जुने आहे.

कटासराज शिव मंदिर कटासराज शिव मंदिर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहे. लग्नानंतर भगवान शिव आणि माता सती यांनी काही काळ या गावात वास्तव्य केले असे म्हटले जाते. भगवान शिवाचे हे मंदिर 900 वर्षे जुने आहे. डोंगरावर बांधलेल्या या मंदिरात हिंदू धर्माचे भक्त दररोज भक्तीभावाने पूजा करतात.

गोरखनाथ मंदिर पेशावरजवळील गोरखनाथ मंदिर हे पाकिस्तानातील सुंदर हिंदू मंदिरांमध्ये गणले जाते. स्वातंत्र्यानंतर या मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले होते, परंतु 2011मध्ये ते भाविकांसाठी पुन्हा उघडण्यात आले. लोक गोरखनाथाचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात.

वरुण देव मंदिर पाकिस्तानमध्ये असलेले वरुण देव मंदिर 1000 वर्षांहून अधिक जुने आहे. फाळणीनंतर ते बंद करण्यात आले होते परंतु 2007 मध्ये हिंदू कौन्सिल ऑफ पाकिस्तानच्या संघर्षानंतर ते पुन्हा उघडण्यात आले.