प्रचंड सुंदर अभिनेत्री, जिला वाचवण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी धोक्यात घातलेला जीव, आता कुठे आहे?
अमिताभ बच्चन यांच्या सिनेमांत झळकलेली ही अभिनेत्री अचानक झाली गायब; आज आहे पंजाबी सिनेसृष्टीतील सुपरस्टार. जिला वाचवण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी लावलेली जिवाची बाजी.

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आपल्या अभिनयाने लोकप्रिय झाल्या. मात्र, काही अभिनेत्री नाव आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर अचानक हिंदी सिनेमापासून दूर गेल्या. अशीच एक अभिनेत्री म्हणजे प्रीती सप्रू. 70 च्या दशकातील सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती.

त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘लावारिस’ आणि ‘आज का अर्जुन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटांमध्ये प्रीती सप्रू यांच्या भूमिका तुलनेने छोट्या होत्या. त्यामुळे कदाचित त्यांच्याकडे प्रेक्षकांचे फारसे लक्ष गेले नसेल. मात्र, पडद्यावर त्यांच्या व्यक्तिरेखेवर संकट आले की अमिताभ बच्चन यांची व्यक्तिरेखा मदतीला धावून येत असे.

प्रीती सप्रू यांचा जन्म एका चित्रपट कुटुंबात झाला. त्या प्रसिद्ध अभिनेते डी. के. सप्रू यांच्या कन्या आहेत. डी. के. सप्रू यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांची आई हेमवती सप्रू यादेखील अभिनेत्री होत्या.

प्रीती सप्रू यांच्याशी संबंधित एक किस्सा आजही चर्चेत असतो. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रीती सप्रू यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. या घटनेमुळे प्रीती सप्रू आजही अमिताभ बच्चन यांच्याबद्दल कृतज्ञ असल्याचे सांगितले जाते.

आज प्रीती सप्रू या अभिनेत्री आणि दिग्दर्शिका म्हणून ओळखल्या जातात. त्याचबरोबर त्या सामाजिक कार्यातही सक्रिय असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हिंदी सिनेमातून तुलनेने दूर गेल्यानंतरही त्यांनी पंजाबी मनोरंजनसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.