Kidney Health : किडनी खराब होण्याआधी शरीर देत हे 8 संकेत; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो धोका
किडनीच्या कार्यात बिघाड झाल्यास शरीरात काही बदल दिसून येऊ शकतात. लघवीतील बदल, सूज, थकवा आणि इतर संकेतांकडे दुर्लक्ष करू नका.

सतत थकवा आणि अशक्तपणा :किडनी रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव बाहेर काढण्याचं महत्त्वाचं काम करते. किडनी जर खराब झाली तर त्यात अपायकारक पदार्थ साचू शकतात. त्यामुळे सतत थकवा, अशक्तपणा किंवा नेहमीपेक्षा कमी ऊर्जा जाणवू शकते.
लघवीच्या सवयींमध्ये बदल :किडनीच्या समस्यांमध्ये लघवीच्या प्रमाणात किंवा वारंवारतेत बदल जाणवू शकतो. काही लोकांना नेहमीपेक्षा जास्त वेळा, विशेषत: रात्री लघवीला सारख जायला लागू शकतं.
लघवीला जास्त फेस येणे :लघवीमध्ये सतत किंवा जास्त प्रमाणात फेस दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नय. काही परिस्थितींमध्ये हे लघवीत प्रोटीन जाण्याशी संबंधित असू शकते.
लघवीचा रंग किंवा स्वरूप बदलणे :लघवीचा रंग आपण् किती पाणी प्यायलो आहोत यावरही बदलतो. मात्र लघवीमध्ये रक्त दिसणे, खूप गडद रंग वारंवार दिसणे किंवा लघवीचे प्रमाण जास्त कमी होणे हे किडनी खराब झाल्याचे लक्षणे असू शकतात.
पाय, घोटे किंवा चेहऱ्यावर सूज येणे : किडनी शरीरातील नको असलेले पदार्थ जर बाहेर टाकू शकली नाही तर शरीरात पाणी साचू शकतं. यामुळे पाय, घोटे किंवा डोळ्यांच्या आसपास सूज येऊ शकते. अशी सूज येण्यामागे हृदयाचे आजार देखील असू शकतात.
मळमळ, उलटी किंवा भूक कमी होणे : किडनी खराब झाल्यावर शरीरात नको असलेले पदार्थ साचून राहतात. त्यामुळे कमी भूक लागते तसेच मळमळ,उलटी अशी लक्षणं दिसू शकतात.
त्वचेला खाज आणि कोरडेपणा : किडनीचे खराब झाल्यास त्याचे परिणाम आपल्या त्वचेवरही दिसू लागतात. त्वचा कोरडी पडणे, सतत खाज येणे, त्वचेचे आजार,अॅलर्जी हि लक्षणे दिसू लागतात.
श्वास घेण्यास त्रास : किडनी खराब झाल्यावर त्याचा परिणाम फुफ्फुसांवर होतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)