या 81 वर्षीय अभिनेत्रीचे फोटो खिशात ठेवून युद्ध लढायचे अमेरिकन सैनिक, बोल्ड फोटोशूटने उडालेली खळबळ, फोटो…

81 वर्षीय अभिनेत्री जिचे फोटो खिशात ठेवून युद्ध लढत होते अमेरिकन सैनिक. जिच्या बोल्ड फोटोशूटने उडवलेली खळबळ, कोण आहे ती पहिली ग्लॅमरस गर्ल? फोटो पाहून..

| Updated on: Apr 28, 2026 | 3:58 PM
1 / 7
हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा पडद्यावर साधेपणा आणि पारंपरिक प्रतिमेचे वर्चस्व होते तेव्हा एक अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस अंदाजाने आणि आत्मविश्वासाने संपूर्ण इंडस्ट्रीला चकित करून गेली.

हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा पडद्यावर साधेपणा आणि पारंपरिक प्रतिमेचे वर्चस्व होते तेव्हा एक अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस अंदाजाने आणि आत्मविश्वासाने संपूर्ण इंडस्ट्रीला चकित करून गेली.

2 / 7

40-50 च्या दशकात जेव्हा ‘बोल्डनेस’ हा शब्दही फारसा प्रचलित नव्हता. त्या काळात या अभिनेत्रीने आपल्या स्टाइलमुळे वेगळी ओळख निर्माण केली. ही अभिनेत्री म्हणजे बेगम पारा.

3 / 7

बेगम पारा यांना हिंदी सिनेमातील पहिली ‘ग्लॅमर गर्ल’ म्हणून ओळखले जाते. त्यांचे सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्व इतके प्रभावी होते की त्यांची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित राहिली नाही. परदेशातही त्यांची मोठी चर्चा होती.

4 / 7

असे म्हटले जाते की, त्यांच्या छायाचित्रांचा प्रभाव इतका होता की अमेरिकन सैनिकदेखील युद्धभूमीवर जाताना त्यांचा फोटो जवळ ठेवत असत. ही त्या काळातील त्यांच्या लोकप्रियतेची मोठी साक्ष मानली जाते.

5 / 7

1944 साली 'चाँद' या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, त्यांना सुरुवातीला मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका फारशा मिळाल्या नाहीत. तरीही मॉडेल म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. याच काळात त्यांनी एक धाडसी फोटोशूट करून खळबळ उडवली.

6 / 7

त्या काळात अभिनेत्री प्रामुख्याने साडी किंवा पारंपरिक पोशाखात दिसत असताना, बेगम पारा यांनी Life Magazine साठी केलेल्या बोल्ड फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

7 / 7

या फोटोशूटमध्ये त्यांनी हातात सिगारेट, मोकळे केस आणि प्रचंड आत्मविश्वासाने पोझ दिली होती. हे फोटोशूट प्रसिद्ध छायाचित्रकार जेम्स बर्के यांनी केले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us