22 वर्षे वादात सापडलेलं गाणं, इतकं रोमँटिक की ऐकताच लोक नाचायला लागतात, आजही अनेकांचं आवडतं

90 च्या दशकातील सुपरहिट गाणं जे आजही लोकांच्या ओठांवर. ज्यामध्ये गोविंदा-शिल्पाच्या डान्स स्टेप आणि केमिस्ट्रीने बॉक्स ऑफिसवर घातला होता धुमाकूळ.

| Updated on: May 10, 2026 | 4:01 PM
1 / 5
90 चं दशक हे हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीताचं सुवर्णयुग मानलं जातं. त्या काळात रिलीज झालेली अनेक गाणी आजही लोकांच्या मनात ताजी आहेत. रोमँटिक गाण्यांची जादू अशी होती की रेडिओ, कॅसेट प्लेयर आणि टीव्हीवर सतत तीच गाणी ऐकू यायची.

90 चं दशक हे हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीताचं सुवर्णयुग मानलं जातं. त्या काळात रिलीज झालेली अनेक गाणी आजही लोकांच्या मनात ताजी आहेत. रोमँटिक गाण्यांची जादू अशी होती की रेडिओ, कॅसेट प्लेयर आणि टीव्हीवर सतत तीच गाणी ऐकू यायची.

2 / 5

त्या काळात काही गाणी अशी होती, जी केवळ चित्रपटांपुरती मर्यादित राहिली नाहीत तर लग्नसमारंभ, पार्टी, गरबा, डिस्को आणि प्रत्येक फंक्शनची शान बनली. लोक आपल्या आवडत्या स्टार्सची स्टाईल कॉपी करायचे. गाण्यांमधील कपडे, डान्स स्टेप्स आणि लोकेशन्सही प्रचंड चर्चेत असायची.

3 / 5

अशाच 30 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या एका सुपरहिट गाण्याने त्या काळात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. एकदा हे गाणं ऐकलं की ते नकळत ओठांवर यायचंच. हे गाणं म्हणजे ‘एक चुम्मा तू मुझको उधार दे दे’. आजही हे गाणं अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहे.

4 / 5

या गाण्यात गोविंदा आणि शिल्पा शेट्टी यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. दोघांच्या डान्स स्टेप्स आणि एक्सप्रेशन्सने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं होतं. त्यामुळे लोक हे गाणं पुन्हा पुन्हा पाहत आणि ऐकत होते.

5 / 5

हे गाणं 1996 मध्ये रिलीज झालेल्या 'छोटे सरकार' या चित्रपटातील होतं. ‘एक चुम्मा तू मुझको उधार दे दे’ हे गाणं त्या काळात इतकं लोकप्रिय झालं होतं की लग्न, पार्टी, गरबा किंवा कोणताही उत्सव या गाण्याशिवाय अपूर्ण वाटायचा. गाण्याची धमाकेदार बीट्स आणि मजेशीर शब्द लोकांना नाचायला भाग पाडायचे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us