
आजच्या जमान्यात एटीएम हे प्रत्येकाची गरज बनले आहे. कुणा-कुणाकडे तर अनेक बँकांची एटीएम असतात. त्यामुळे तुम्हाला पैसे काढण्यासाठी बँकेत जावे लागत नाही. मात्र या जमान्यातही दुनियेत एक असा देश आहे, जिथे एकही एटीएम नाही. इथे लोकांना पैसे काढण्यासाठी आजही बँकेत जावे लागते. या देशाचे नाव इरीट्रिया आहे. या देशात अजून काही अजब कायदे लागू केले आहेत.

या देशात टीव्हीवरही सरकारने अनेक बंधने घातली आहेत. इथे लोकांना टीव्हीवर तेच चॅनल दिसतात जे सरकारला दाखवायचे आहेत.

तुमाला आश्चर्य वाटेल, मात्र हा देश 1993 मध्येच स्वतंत्र झाला आहे, परंतु तेव्हापासून आतापर्यंत एकाच राष्ट्रपतीचे शासन आहे. ज्यांचे नाव आहे इसायास अफेवेर्की. इतर सरकारवर टीका करणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्यात येते.

या देशात मोबाईलसाठी सीमकार्ड खरेदी करणेही अत्यंत कठिण आहे आणि काहीही करून सीमकर्ड खरेदी केले तर त्यात इंटरनेट चालत नाही.

या देशातील युवकांना सैन्याचे प्रशिक्षण घ्यावेच लागते. जो कुणी सैन्याचे प्रशिक्षण घेत नाही त्याला पासपोर्ट मिळत नाही आणि तो देश सोडूनही जाऊ शकत नाही. आता एवढे निर्बंध घातल्यानंतर अनेक लोक बेकायदेशीररित्या देश सोडून गेले आहेत.