
सर्वसाधारणपणे गायीला एकच वासरु जन्माला येत असते. परंतू परभणीच्या पूर्णा तालुक्यातील मुंबर येथील शेतकरी तुकाराम शिंदे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या गायीने दोन वासरांना जन्म दिल्याने कुतुहूल निर्माण झाले आहे.

गायींना एकच वासरु येत असताना आता पूर्णा तालुक्यातील मुंबर येथील शेतकरी तुकाराम शिंदे यांच्या गायीने एकाच वेळी दोन वासरांना जन्म दिल्याने संपूर्ण पंचक्रोशीत या गायीची चर्चा सुरु आहे.

शेतकऱ्याच्या गायीने दोन वासरांना जन्म दिल्याने या अनोख्या गायीला पाहण्यासाठी दूरदूरवरुन लोक येत आहेत. या दोन्ही वासरे आणि गायीची प्रकृती उत्तम आहे.

गाय केवळ एका वेळी एकच वासरु जन्माला घालीत असते. परंतू या गावरान गाईने दोन वासरं जन्माला घातल्याने कुतूहल व्यक्त केले जात आहे.

गावराण गाईने दोन वासरं जन्माला घातल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. या गायीला आणि वासरांना पाहाण्यासाठी गर्दी होत आहे. ही दोन्ही वासरं गायीचे दूध पिताने आपआपसात चढाओढ करत असल्याचे चित्र दिसत आहे.