साईबाबांच्या चरणी 25 लाख 70 हजारांची टाटा सिएरा अर्पण, पुणे रिजनच्या डिलर्सकडून भेट

टाटा मोटर्सकडून सामाजिक बांधिलकी जपत साईबाबा संस्थानला 25 लाख 70 हजारांची टाटा सिएरा कार देणगी म्हणून अर्पण केली आहे. भक्ताने दिलेली ही मौल्यवान देणगी संस्थानच्या दैनंदिन प्रशासकीय तसेच सेवाभावी कार्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी संस्थानच्या वतीने सांगण्यात आले.

| Updated on: Jan 22, 2026 | 11:32 PM
1 / 5
शिर्डीच्या साईबाबांच्या दरबारात भक्त दानधर्म करत असतात. मात्र, यंदा एका भक्ताने चक्क  25 लाख 70 हजारांची टाटा सिएरा कारची देणगी म्हणून दिली आहे.

2 / 5
 कार, दुचाकी तसेच विवीध वाहननिर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपन्या आपले पहिले वाहन बाजारात विक्रीसाठी उतरवताना त्या वाहनास चांगले यश मिळावे या भावनेतून साईचरणी ते वाहन अर्पण करत असतात.

3 / 5
टाटा मोटर्स, पुणे रिजनच्या डिलर्सकडून साईबाबा संस्थानला ही 25 लाख 70 हजारांची टाटा सिएरा कार देणगी म्हणून अर्पण केली आहे.महाराष्ट्रात या कारची विक्री सुरु होण्याआधी ही पहिली कार साईचरणी अर्पण करण्यात आली आहे.

4 / 5
 टाटा मोटर्स, पुणे रिजन येथील सर्व अधिकृत डिलर्स यांच्या वतीने ही देणगी देण्यात आली. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या तसेच टाटा मोटर्सच्या डिलर्स यांच्या उपस्थितीत यावेळी वाहनाची विधीवत पुजा पार पडली.

5 / 5
 पूजा संपन्न झाल्यानंतर वाहनाची चावी अधिकृतरीत्या संस्थानकडे सुपूर्द करण्यात आली.याप्रसंगी साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी टाटा मोटर्स, पुणे रिजनच्या सर्व डिलर्स यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.