55 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा शेअर, 2000 टक्क्यांचा रिटर्न, हाती लागला अलादीनचा चिराग

Share Market: 55 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या या शेअरने 2,000 टक्क्यांचा परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षात या शेअरने कमाल करून दाखवली आहे. गेल्या तीन वर्षात या शेअरने 230 टक्क्यांचे रिटर्न दिले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

| Updated on: Jan 13, 2026 | 5:18 PM
1 / 6
One Point Solutions Stock : गेल्या काही वर्षात SME कंपन्यांनी शेअर बाजारात जोरदार कामगिरी बजावली. काही कंपन्या तर मल्टिबॅगर ठरल्या आहेत. त्यांनी कमी वेळेत 500 ते 2000 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. अशीच एक कंपनी आहे जिने पाच वर्षांत गुंतवणूकदारांना 2000 टक्क्यांची कमाई करून दिली आहे.

2 / 6
One Point One Solutions  या कंपनीच्या शेअरची किंमत मंगळवारी दोन टक्क्यांनी वधारली. कंपनी आता बाजारातून मोठा निधी जमा करणार आहे. हे वृत्त धडकताच हा स्मॉल कॅप स्टॉक BSE वर 2.62 टक्क्यांपर्यंत वधारला. हा शेअर बाजारात 54.70 रुपये प्रति शेअरवर पोहचला.

3 / 6
12 जानेवारी 2026 रोजी एका अहवालात कंपनीने स्पष्ट केले की, निधी जमाविण्याविषयीचा विशेष ठराव मंजूर करण्यात आला. बहुमताने कंपनीच्या भागधारकांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये लागलीच वाढ झाली. कंपनीचे प्रमोटर्स आणि काही नॉन प्रमोटर्स वॉरंट जारी करतील.

4 / 6
गेल्या एका महिन्यात वन पॉईंट वन सोल्यूशन्स कंपनीचा शेअर तीन टक्क्यांनी वधारला आहे. तर गेल्या एका वर्षात हा शेअर 6 टक्क्यांनी उसळला आहे. गेल्या तीन वर्षांत कंपनीचा शेअर 230 टक्क्यांनी वधारला. तर पाच वर्षात या शेअरने तुफान आणले आहे. हा शेअर 2,000 टक्क्यांनी उसळला आहे.

5 / 6
अक्षय छाबडा,अफरीन डीआयए हे प्रमोटर्स आणि एएल महा इन्व्हेस्टमेंट फंड पीसीसी,कुलिनन अपॉर्च्युनिटज इनककॉर्पोटेड व्हीसीसी, क्राफ्ट इमर्जिंग मार्केट फंड पीसीसी हे नॉन प्रमोटर्स निधी जमाविण्यासाठी वॉरंट जारी करतील. त्यामुळे हा शेअर येत्या काही दिवसात पुन्हा चर्चेत असेल.

6 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.