ट्रायल पीरिअड संपला..; लग्नाच्या दीड वर्षानंतर कपूर कुटुंबाच्या सुनेनं केलं हे काम, एकच चर्चा

रणबीर कपूर, करिश्मा आणि करीना कपूर यांचा चुलत भाई आदर जैन याने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात धूमधडाक्यात लग्न केलं होतं. आता लग्नाच्या दीड वर्षानंतर त्याने आणि त्याची पत्नी आलेखा अडवाणी यांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

| Updated on: Sep 24, 2026 | 9:32 AM
1 / 5
अभिनेता रणबीर कपूरचा चुलत भाऊ आदर जैन आणि त्याची पत्नी आलेखा अडवाणी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. लग्नाच्या जवळपास दीड वर्षानंतर या जोडप्याने अखेर आपल्या विवाहाची कायदेशीर नोंदणी केली आहे. दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना ही खास बातमी दिली.

अभिनेता रणबीर कपूरचा चुलत भाऊ आदर जैन आणि त्याची पत्नी आलेखा अडवाणी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. लग्नाच्या जवळपास दीड वर्षानंतर या जोडप्याने अखेर आपल्या विवाहाची कायदेशीर नोंदणी केली आहे. दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना ही खास बातमी दिली.

2 / 5

विशेष म्हणजे, या गुड न्यूजची घोषणा करताना आदर आणि आलेखाने वापरलेला मजेशीर अंदाज सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. आदर आणि आलेखाने मॅरेज रजिस्ट्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघंही विवाहाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना दिसत आहेत.

3 / 5

एका फोटोमध्ये दोघे एकत्र पोज देताना दिसतात, तर काही फोटोंमध्ये कुटुंबीयांसोबतचे क्षणही पाहायला मिळतात. फोटो शेअर करताना दोघांनी लिहिलं, 'ट्रायल पीरिअड संपला. रिटर्न नाही, एक्स्चेंजही नाही, माघारही नाही..' यानंतर त्यांनी आता अधिकृतपणे ‘मिस्टर आणि मिसेस जैन’ झाल्याचं सांगितलं. त्यांनी या खास क्षणी गणपती बाप्पाचे आभारही मानले.

4 / 5

आदर आणि आलेखाने 2025 मध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीने लग्न केलं होतं. 12 जानेवारी 2025 रोजी गोव्यात त्यांचा व्हाइट वेडिंग (ख्रिश्चन पद्धतीने) सोहळा पार पडला. त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये मुंबईत पारंपरिक हिंदू पद्धतीने विवाह झाला. या विवाह सोहळ्याला कपूर कुटुंबीयांसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

5 / 5

या लग्नानंतर आता सप्टेंबर 2026 मध्ये दोघांनी विवाहाची कायदेशीर नोंदणी पूर्ण केली आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ही प्रक्रिया पार पडल्याचं वृत्त आहे. आदर शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याची आई रिमा जैनही दिसत आहे. आदर हा दिवंगत अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर यांचा नातू, रिमा जैन यांचा मुलगा आणि रणबीर कपूर, करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर यांचा चुलत भाऊ आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us