Pooja Birari-Soham Bandekar : रंगलो हळदीच्या रंगात.. सोहम-पूजाच्या हळदीचे Inside Photo समोर ! बांदेकरांची धमाल

कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांची हळद नुकतीच पार पडली असून, त्यांची धमाल, मस्ती, हास्याचे फवारे याची खास झलक समोर आली आहे. त्यांचे सर्व फोटो व्हायर झाले असून लग्नसोहळा कधी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चाहत्यांनी पूजा-सोहमला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated on: Dec 01, 2025 | 10:22 PM
1 / 7
महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर हे दोघं सासू-सासरे होणार आहेत. त्यांच्या लाडक्या लेकांचं म्हणजेच सोहम बांदेकरचं लग्न अगदी जवळ येऊन ठेपलं असून मराठमोळी अभिनेत्री पूजा बिरारीसोबत तो लगीनगाठ बांधणार आहे. दोन दिवसांपूर्वीच पूजाने तिच्या मेहंदी सोहळ्याची झलक शेअर केली होती. तर आता पूजा-सोहमच्या हळदीचे धमाल फोटो सर्वांसमोर आले आहेत.

2 / 7
रंगलो हळदीच्या रंगात.. असं म्हणत पूजा आणि सोहम यांनी त्यांच्या खास दिवसाचा फोटो शेअर केला आहे. ऑरेंज कलरच्या कुर्त्यात सोहम एकदम राजबिंडा दिसत होता. तर पूजाने देखील तिच्या होणाऱ्या अहोंच्या कपड्यांशी मॅचिंग असा कुर्ता, सलवार आणि साजेशी ओढणी असा गेटअप केला होता. त्याला साजेसे दागिने, सुरेख मेकअप यामुळे तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होतं.

3 / 7
ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता पायजमा घातलेले आदेश बांदेकर, त्यांच्या शेजारी सुहास्य वदनाने उभ्या असलेल्या सुचित्रा बांदेकर आणि त्या दोघांसह सोहम व पूजा असा हा गोड फोटो  सर्वांनाच आवडला आहे. त्यांच्या फोटोंवर चाहत्यांच्या भरभरून लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

4 / 7
नातेवाईक, कुटुंबिय यांच्या गराड्यात, गाणी ऐकत , नाचत धमाल करत बांदेकर आणि बिरारी कुटुंबातलं हे लग्न पार पडत असून सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य विलसताना दिसत आहे. बांदेकरांची होणारी सून कोण हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांच्या मनात होता. आधी मेहंदीचे आणि आता हळदीचे फोटो पाहून चाहते खूप खुश झाले असून त्यांना सोहम आणि पूजाची जोडी खूपच आवडली आहे. सर्वांनी त्यांना भावी आयुष्यासाठी उदंड शुभेच्छा दिल्या आहेत.

5 / 7
काही दिवसांपू्र्वीच सोहम बांदेकर याचं केळवण झालं. सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, पूर्वा गोखले, अभिजीत केळकर य़ांनी मिळून भावी वराचं आणि त्याच्या आई-वडिलांचं  केलवण केलं. तेव्हाही बांदेकरांच्या सूनबाईंबद्दल फारसं कोणाला माहीत नव्हतं, मात्र हळूहळू पूजाच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यानतंर पूजा बिरारी हिचंही तिच्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेच्या सेटवर केळवण झालं.

6 / 7
सोहमने निर्मिती क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. ‘ललित 205’ या मालिकेची निर्मिती त्याने केली.  पूजा सध्या  ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे

7 / 7
याआधी पूजाने ‘साजणा’ आणि ‘स्वाभिमान- शोध अस्तित्वाचा’ अशा मालिकांमध्ये काम करून अभिनयाचा अवीट ठसा उमटवला. ‘स्वाभिमान’ या मालिकेतून विशेष प्रसिद्धी मिळालेल्या पूजाचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.