
बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींची मुलं धिरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतात. त्यामुळे जेव्हा या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो, तेव्हा सेलिब्रिटींची मांदियाळी त्यात पहायला मिळते. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची मुलगी आराध्या बच्चनसुद्धा याच शाळेत शिकते.

आराध्याचा जन्म 16 नोव्हेंबर 2011 रोजी झाला. ती आता 14 वर्षांची असून सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्टारकिड्सपैकी एक आहे. आराध्या मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतेय. तिच्यासोबत इतरही सेलिब्रिटींची मुलं या शाळेत शिक्षण घेत आहेत.

या शाळेत आराध्या नर्सरीपासून शिक्षण घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ती सध्या आठवीत आहे. या शाळेची फी लाखो रुपयांमध्ये असल्याचं समजतंय. ऐश्वर्या आणि अभिषेक त्यांच्या एकुलत्या एक मुलीच्या शिक्षणासाठी दर महिन्याला 4.5 लाख रुपये फी भरतात.

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची नर्सरी ते सातवीपर्यंत एक महिन्याला जवळपास 1.70 लाख रुपये फी आहे. त्यानंतर आठवी ते हायस्कूलपर्यंत दर महिन्याला 4.5 लाख रुपये फी भरावी लागते. या शाळेत विद्यार्थ्यांसाठी अनेक सोयीसुविधा आहेत.

शाळेच्या वार्षित स्नेहसंमेलन कार्यक्रमात आराध्याला अनेकदा परफॉर्म करताना पाहिलं गेलंय. तिच्या परफॉर्मन्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. गेल्या वर्षी आराध्याने शाहरुखचा मुलगा अबरामसोबत स्टेजवर नाटक सादर केलं होतं.