‘आशिकी’नंतर मिळाली होती मोठी ऑफर, राहुल रॉयने दिला नकार; 33 वर्षांनंतर आजही होतो पश्चात्ताप

Rahul Roy: जर राहुल रॉयने या चित्रपटाची ऑफर स्वीकारली असती तर कदाचित त्याच्या कारकिर्दीची दिशा पूर्णपणे वेगळी असती. त्या चित्रपटाला नकार दिल्याचा पश्चात्ताप आजही होत असल्याचं त्याने म्हटलंय.

| Updated on: Aug 28, 2026 | 10:38 AM
1 / 5
'आशिकी' या चित्रपटातून रातोरात स्टार झालेला अभिनेता राहुल रॉय आजही नव्वदच्या दशकातील त्याच्या एका निर्णयाबद्दल पश्चात्ताप व्यक्त करतो. महेश भट्ट यांच्या 1990 मध्ये आलेल्या 'आशिकी'ने राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटातील गाणी आणि राहुलचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला.

2 / 5
मात्र, या यशानंतर राहुलने एका मोठ्या संधीला नकार दिला होता. राहुलने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याला जवळपास 49 सिनेमांच्या ऑफर्स मिळाल्या होत्या. त्याच काळात दिग्दर्शक यश चोप्रांनी त्याला एका चित्रपटाची कथा ऐकवण्यासाठी बोलावलं होतं. मात्र, राहुल आधीच अनेक चित्रपटांसाठी कमिट झाला होता. त्याच्या तारखा मिळवण्यासाठी निर्मात्यांमध्येही चढाओढ सुरू होती. त्यामुळे यश चोप्रांच्या ऑफरकडे त्याला अपेक्षित लक्ष देता आलं नाही.

3 / 5
राहुल रॉयच्या म्हणण्यानुसार, यश चोप्रांनी त्याला दिलेली ही ऑफर दुसरी-तिसरी कोणती नसून ‘डर’ या चित्रपटाची होती. या चित्रपटातील ‘राहुल मेहरा’ ही भूमिका त्याला डोळ्यासमोर ठेवून लिहिण्यात आली होती, असा दावा राहुलने केला होता. मात्र त्याने हा सिनेमा स्वीकारला नाही.

4 / 5
नंतर हीच भूमिका शाहरुख खानने साकारली आणि ‘डर’ त्याच्या करिअरमधील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. ‘क-क-क-क-किरण’ हा डायलॉग आणि शाहरुखचा खलनायकी अंदाज आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ‘डर’नंतर शाहरुख खानच्या कारकिर्दीला मोठी झेप मिळाली.

5 / 5
राहुल रॉयने स्पष्टपणे कबूल केलं होतं की, ‘डर’ हा चित्रपट साइन न केल्याची त्याला आजही मोठी खंत आहे. मात्र त्याचवेळी त्याने आपल्या निर्णयामागची परिस्थितीही सांगितली होती. त्या काळात अनेक चित्रपट हातात असल्याने कोणता सिनेमा करायचा आणि कोणता सोडायचा, हे ठरवणं त्याच्यासाठी कठीण झालं होतं.

Follow Us