Abhijeet Dipke income Source : ना नोकरी ना धंदा…अभिजीत दिपके कुठून कमावतात पैसा?
Abhijeet Dipke income Source : अभिजीत दिपके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दिल्लीत आंदोलनाची हाक दिल्याने दिपके चर्चेत आलेत. ते कुठून पैसा कमावतात,यावर चर्चा सुरू झाली आहे.

सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपके यांची जोरदार चर्चा होत आहे. अभिजीत दिपके कधी आंदोलन तर कधी वक्तव्यामुळे चर्चेत असतात. अभिजीत दिपके सहज कार आणि विमानातून प्रवास करतात.
अभिजीत दिपके हे नोकरी देखील करत नाहीत. त्यांचा व्यवसाय देखील करत नाही. त्यानंतरही त्यांच्याकडून होणाऱ्या खर्चावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
अभिजीत दिपके हे केवळ सोशल मीडिया अॅक्टिविस्ट नाहीत. दिपके यांनी याआधी पॉलिटिकल कम्युनिकेशन आणि डिजिटल कँपेनिंग केलं आहे. त्यांनी पुण्यातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आहे.
अभिजीत दिपके यांनी तीन वर्ष आम आदमी पार्टीच्या सोशल मीडियासोबत काम केलं आहे. त्यांनी 'आप'साठी डिजिटल कँपेन देखील केलं आहे.
आता अभिजीत दिपके कोणत्या कंपनीत काम करतात, याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कॉक्रोच जनता पार्टी पैसा कुठून खर्च करते, याविषयी देखील माहिती समोर आलेली नाही.