एसी दुरुस्त करण्यासाठी गल्लीतला मेकॅनिक की कंपनीचा इंजिनिअर, कोण बेस्ट? कुठे वाचतील तुमचे हजारो रुपये

उन्हाळ्यात एसी आणि फ्रिजच्या दुरुस्तीसाठी स्थानिक मेकॅनिक निवडावा की कंपनीचे अधिकृत सेंटर? तुमचे पैसे कुठे वाचतील आणि उपकरणाचे आयुष्य कसे वाढेल, याबद्दलची सविस्तर माहिती आणि तुलना येथे वाचा.

| Updated on: Apr 20, 2026 | 1:19 PM
1 / 6
गेल्या काही दिवसांपासून उन्हाळा प्रचंड वाढला आहे. उन्हाळा सुरू झाला की घरातील एसी आणि फ्रिजचा वापर वाढतो. मात्र, उपकरणाची वॉरंटी संपली की ग्राहकांसमोर मोठा प्रश्न असतो की याची सर्व्हिसिंग कुठे करायची? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाळा प्रचंड वाढला आहे. उन्हाळा सुरू झाला की घरातील एसी आणि फ्रिजचा वापर वाढतो. मात्र, उपकरणाची वॉरंटी संपली की ग्राहकांसमोर मोठा प्रश्न असतो की याची सर्व्हिसिंग कुठे करायची? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

2 / 6

सर्व्हिसिंगसाठी गल्लीतल्या मेकॅनिकला बोलवायचे की कंपनीच्या अधिकृत सेंटरला फोन करायचा? या दोन्ही पर्यायांमध्ये नेमका फरक काय? आणि तुमचे पैसे कुठे वाचतील? हे जाणून घेणे गरजेचे आहे.

3 / 6

जर तुम्हाला पैशांची बचत करायची असेल, तर स्थानिक मेकॅनिक हा उत्तम पर्याय आहे. स्थानिक मेकॅनिककडून काम करून घेणे कंपनीच्या तुलनेत ४० ते ६० टक्के स्वस्त पडते. कंपनीचे मेकॅनिक येण्यासाठी २४ ते ४८ तास लागतात, पण स्थानिक मेकॅनिक अवघ्या २-३ तासांत तुमच्या घरी पोहोचू शकतात.

4 / 6

कंपनीकडून सर्व्हिसिंग करून घेण्याचे काही खास फायदे आहेत जे स्थानिक मेकॅनिककडे मिळत नाहीत. कंपनीचे मेकॅनिक हे त्या ब्रँडच्या तांत्रिक बाबींसाठी विशेष प्रशिक्षिण घेतलेले असतात. जर उपकरणाचा एखादा भाग खराब झाला, तर कंपनी नेहमी ओरिजनल स्पेअर पार्ट्स वापरते.

5 / 6

एसीच्या खोलवर स्वच्छतेसाठी कंपनीचे लोक प्रेशर जॅकेट्स आणि आधुनिक साधनांचा वापर करतात, ज्यामुळे उपकरण जास्त काळ टिकते. स्थानिक मेकॅनिक निवडताना काही धोकेही असतात. अनेकदा त्यांच्याकडे योग्य साधने नसतात, ज्यामुळे ते फक्त वरवरची साफसफाई करतात. तसेच, ते स्वस्त किंवा बनावट पार्ट्स वापरण्याची शक्यता असते, ज्याचा परिणाम उपकरणाच्या आयुष्यावर होतो.

6 / 6

जर तुमच्या एसी किंवा फ्रिजमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण नसेल आणि फक्त धूळ साफ करायची असेल, तर अनुभवी स्थानिक मेकॅनिक हा परवडणारा पर्याय आहे. जर गॅस लीकेज, कॉम्प्रेसरची समस्या किंवा तांत्रिक बिघाड असेल, तर कंपनीच्या मेकॅनिककडूनच दुरुस्ती करून घेणे सुरक्षित ठरते. थोडक्यात सांगायचे तर, लहान कामांसाठी स्थानिक आणि मोठ्या कामांसाठी कंपनीचा पर्याय निवडणे हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us