मांडवी एक्सप्रेसमध्ये एसी बंद, उकाड्याने प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वे आता रिफंड देणार का ? प्रवाशांचा संतप्त सवाल

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची लोकप्रिय ट्रेन असलेल्याय मांडवी एक्सप्रेसमध्ये थर्ड इकॉनॉमी क्लासच्या डब्याचे एसी बंद पडल्याने प्रवाशांचे उकाड्याने हाल झाले आहे. लहान मुले आणि सिनियर सिटीझन यांना याचा मोठा त्रास झाला आहे. रेल्वे आता आम्हाला रिफंड देणार का असा सवाल प्रवाशांनी केला आहे.

| Updated on: Jun 26, 2026 | 6:35 PM
1 / 6
कोकणात धावणाऱ्या मांडवी एक्सप्रेसच्या थर्ड इकॉनॉमी क्लासच्या डब्याचे एसी बंद पडल्याने प्रवाशांची अक्षरश: घुसमट झाल्याचा प्रकार घडला आहे.या प्रकारामुळे प्रवाशांचा प्रचंड मन:स्तापाला जावे लागले आहे.

2 / 6
मांडवी एक्सप्रेस ही सकाळी ७.०५ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुटते आणि मडगावपर्यंत धावते. या गाडीच्या 3 E डब्यातील वातानुकूलित यंत्रणा ठप्प झाल्याने प्रवासी अक्षरश: गुदमरले आहेत.

3 / 6
थर्ड इकॉनॉमी क्लासच्या डब्यात एसी असल्याने पंखे देखील बसवलेले नाहीत. त्यामुळे लहान मुले आणि आजारी प्रवासी तसेच सिनियर सिटीजन यांचे प्रचंड हाल होत आहेत.

4 / 6
एसी डबे असल्याने खिडक्या खोलण्याची सोय देखील  नाही,कोकण मार्गावर बोगदे देखील असल्याने शुद्ध हवा डब्यात येण्यास अडचण झाल्याने प्रवाशांनी गुदमरल्या सारखे होत असल्याची तक्रार प्रवाशांनी समाजमाध्यमावर केली आहे.

5 / 6
आधीच ही मांडवी एक्सप्रेस आज एक तास उशीराने सुटली आहे.त्यात एसी अचानक बंद झाला. गाडीतील पाणी संपले असल्याने टॉयलेटची दुर्गंधी सुटल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. मांडवी एक्सप्रेस ही कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची लोकप्रिय ट्रेन आहे, सकाळी सीएसएमटीहून ही गाडी  ७.०५ वाजता सुटते आणि मडगावपर्यंत धावते. ही गाडी बातमी लिहीपर्यंत गाडी रत्नागिरीच्या पुढे आडवली येथे पोहचली आहे. हा गाडी आज 2.45 तास लेट आहे.

6 / 6
खेड रेल्वे स्थानकापासून मांडवी एक्सप्रेस मधील एसी बंद  होता. एसी बंद पडल्यामुळे डब्यामधील प्रवाशांना घामाच्या धारा लागल्या.अनेक प्रवाशांना त्रास झाला. रत्नागिरी रेल्वे स्थानकात मांडवी एक्सप्रेसला थांबवण्यात
आले, त्यानंतर इंजिन बदलण्यात आले. २५ मिनिटाच्या हॉल्टनंतर एसी यंत्रणा सुरु करण्यात आल्याचे आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांनी सांगितले.

खेड रेल्वे स्थानकापासून मांडवी एक्सप्रेस मधील एसी बंद होता. एसी बंद पडल्यामुळे डब्यामधील प्रवाशांना घामाच्या धारा लागल्या.अनेक प्रवाशांना त्रास झाला. रत्नागिरी रेल्वे स्थानकात मांडवी एक्सप्रेसला थांबवण्यात आले, त्यानंतर इंजिन बदलण्यात आले. २५ मिनिटाच्या हॉल्टनंतर एसी यंत्रणा सुरु करण्यात आल्याचे आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांनी सांगितले.

Follow Us