उन्हाळ्यात AC सलग किती तास चालू ठेवावा? हे वाचल्यानंतर पुन्हा कधीच अशी चूक करणार नाही!

उन्हाळ्यात सलग किती तास एसी चालू ठेवणे सुरक्षित आहे? जास्त वेळ एसी चालवल्याने कंप्रेसर फुटण्याचा आणि आग लागण्याचा धोका कसा वाढतो, जाणून घ्या सविस्तर.

| Updated on: May 18, 2026 | 12:51 PM
1 / 6
सध्या सर्वत्र उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकजण घराची रुम  थंड ठेवण्यासाठी आणि उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी सर्रास एअर कंडिशनर (AC) चा वापर करताना पाहायला मिळत आहे.

सध्या सर्वत्र उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकजण घराची रुम थंड ठेवण्यासाठी आणि उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी सर्रास एअर कंडिशनर (AC) चा वापर करताना पाहायला मिळत आहे.

2 / 6

पण अनेकदा लोक घरातून बाहेर जातानाही एसी सुरु ठेवून जातात. घरी परत येईपर्यंत रुम थंड राहील, असा विचार अनेकांचा असतो. पण ही चूक प्रत्यक्षात खूप महागात पडू शकते. यामुळे एसीला भीषण आग लागण्याचा धोका असतो. त्यामुळे एसी सलग किती तास लावावा, याबद्दलची माहिती असणे गरजेचे आहे.

3 / 6

कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण जेव्हा जास्त वेळ सलग चालवले जाते, तेव्हा ते गरम होते. हाच नियम एसीलाही लागू होतो. जर कोणत्याही कारणाशिवाय एसी तासनतास सुरू राहिला तर त्याचे इंजिन आणि कंप्रेसर ओव्हरहीट होते. कंप्रेसर जास्त गरम झाल्यामुळे त्याचा स्फोट होऊ शकतो. ज्यामुळे घरात शॉर्ट सर्किट किंवा आग लागण्याची मोठी दुर्घटना घडू शकते.

4 / 6

'क्रोमा'च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, एसी बंद करण्यापूर्वी तो सलग किती वेळ चालवावा, हे प्रामुख्याने खोलीचा आकार आणि एसीची टनेज क्षमता (Tonnage) या दोन गोष्टींवर अवलंबून असते.

5 / 6

जर तुमची खोली छोटी असेल आणि त्यात १-टनचा एसी असेल, तर तो सलग ८ ते १० तास चालवणे सुरक्षित मानले जाते. जर मोठी खोली असेल आणि त्यात १.५ किंवा २ टनाचा एसी असेल, तर तो तुम्ही सलग १२ तासांपर्यंत आरामात वापरू शकता.

6 / 6

एसीची ही ठरवून दिलेली कालमर्यादा संपल्यानंतर, एसी काही वेळासाठी बंद करा. यामुळे कंप्रेसरला थंड होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि ओव्हरहीटिंगचा धोका टळतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us