दिवा-मुंब्रा ट्रॅकवर मृत्यांच्या चपला आणि बॅग, विचलित करणारे दृष्य

दिवा-मुंब्रा स्थानका दरम्यान 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान हा अपघात झाला. एक गाडी कसाऱ्याकडे जात होती, एक छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जात होती. ट्रेन फास्ट असल्याची माहिती देखील समोर येत आहे. सध्या घटनास्थळावरील विचलित करणारे दृष्य समोर येत आहेत.

| Updated on: Jun 09, 2025 | 11:42 AM
1 / 5
सीएसएमटीहून कसाऱ्याकडे जाणारा फास्ट ट्रॅक वळणदार आहे आणि याठिकाणी सुरुवातीला 4 -5 जण पडल्याची घटना समोर आली. मात्र आता आकडे वाढत आहेत. मृतांची संख्या आता 10 वर पोहोचली आहे.

2 / 5
मृतांच्या चपला देखील ट्रॅकवर पडल्या आहेत. त्यांचं सामान बॅग आणि काही मैल्यवान वस्तू देखील ट्रॅकवर पडल्या आहेत.

3 / 5
सध्या याप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. पोलीस आणि रुग्णसेवा देखील घटनास्थळी पोहोचली असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

4 / 5
जखमी प्रवाशाने माहिती दिल्यानुसार, तो फुटबोर्डवरून प्रवास करत होता. त्याच्या पाठीला त्याची बॅग लटकलेली होती. त्या बॅगेला अडकल्यामुळे ही घटना घडली.

5 / 5
 पुन्हा घटना घडू नये म्हणून आपोआप दरवाजा बंद होणाऱ्या ट्रेन रेल्वेच्या सेवेत असणार आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.