Chanakya Niti : या ठिकाणी व्हा महाकंजूस, तिजोरीत नेहमी राहतील पैसे, चाणक्या नीतीचे 4 सल्ले वाचाच!
चाणक्य नीतीमध्ये वाईट संगतीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. नातेसंबंध टिकवताना पैसा आणि विश्वास कोणावर खर्च करायचा, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे, असं चाणक्य यांनी सांगितलेलं आहे.

आचार्य चाणक्य यांनी पैसे वाचवण्यासाठी मोलाचे सल्ले दिले आहेत. या सल्ल्यांचे, उपदेशांचे पालन केल्यास तुमच्या पैशांची बचनत होऊ शकते. यातील पहिला संदेश म्हणजे महागड्या वस्तू खरेदी करून श्रीमंत दिसण्याचा प्रयत्न करणे टाळावे. केवळ समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी केलेला खर्च भविष्यात आर्थिक अडचणी निर्माण करू शकतो. लोक तुमच्या खर्चाचे कौतुक करतील, पण त्याचा खरा फायदा तुम्हाला किती होतो, याचा विचार करा, असा मोलाचा उपदेश चाणक्य यांनी दिलेला आहे.
स्वार्थी आणि नकारात्मक लोकांवर खर्च टाळा : तुमच्या पाठीमागे टीका करणाऱ्या किंवा गरजेच्या वेळी साथ न देणाऱ्या व्यक्तींवर पैसा खर्च करू नका. चाणक्य नीतीमध्ये वाईट संगतीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. नातेसंबंध टिकवताना पैसा आणि विश्वास कोणावर खर्च करायचा, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे, असं चाणक्य यांनी सांगितलेलं आहे.
लोक काय म्हणतील? या विचाराने खर्च करू नका : समाजाच्या दबावामुळे लग्न, समारंभ किंवा इतर कार्यक्रमांवर अवाजवी खर्च केला जातो. इतरांना खूश करण्यासाठी कर्ज काढून खर्च करणे पुढे आर्थिक ओझे ठरू शकते. तुमची आर्थिक क्षमता लक्षात घेऊनच खर्च करण्याला प्राधान्य द्या, असा सल्ला चाणक्य यांनी दिलाय.
खोटी लोकप्रियता मिळवण्यासाठी पैसा उधळू नका : महागड्या वस्तू, पार्ट्या किंवा सतत इतरांना खूश करून मिळवलेली प्रसिद्धी कायमस्वरूपी नसते. पैशाच्या जोरावर मिळणारे कौतुक अनेकदा परिस्थिती बदलली की संपते. त्यामुळे इतरांच्या मान्यतेपेक्षा स्वतःची आर्थिक स्थिरता आणि भविष्यातील गरजा महत्त्वाच्या ठरतात, असे चाणक्य सांगतात.
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.