
आचार्य चाणक्य यांनी दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन केले तर आपले जीवन समृद्ध होऊ शकते. त्यांनी शत्रूला पराभूत करण्यासाठी काही खास सल्ले दिलेले आहेत.

आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार सगळे शत्रू हे एकसारखेच नसतात. प्रत्येक शत्रूचा स्वभाव, त्याची ताकद वेगळी असते. त्यामुळेच शत्रूचा अभ्यास करूनच त्याला पराभूत करण्याची रणनीती आखायला हवी.

एखादा शत्रू फारच बलवान असेल तर त्याच्याशी थेट दोन हात करणे टाळावे. याउलट चालाकी आणि योग्य रणनीती आखूनच त्याला पराभूत करण्याची योजना आखावी. या उलट तुमचा एकाद्या शत्रूची ताकद ही तुमच्याप्रमाणेच असेल तर त्याला विनम्रतेने समजावून सांगावे.

तुमच्याएवढीच ताकद असणारा शत्रू प्रेमानेही सांगून ऐकत नसेल तर बळाचा वापर करून त्याला पराभूत करावे. शत्रूचा स्वभाव, त्याची ताकद लक्षात घेऊनच आपले डावपेच आखावेत. काही शत्रू हे फारच धूर्त असतात. तुमच्यासोबत राहून ते तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करतात.

मित्र असल्याचे दाखवून तुमचा घात करू पाहणाऱ्या मित्रांना लवकरात लवकर आयुष्यातून दूर सारले पाहिजे. कारण ते जवळ राहून तुमच्या सर्व कमकुवत बाजू समजून घेतात आणि नंतर तुमच्यावर हल्ला करतात. परिणामी काहीही समजायच्या आत तुमचा पराभव होऊ शकतो.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.