
चाणक्य हे फार विद्वान होतो. त्यांचे अर्थशास्त्र, राजकारणातील ज्ञान अतुलनीय होतो. म्हणूनच त्यांनी दिलेल्या सल्ल्यांचे, दिलेल्या शिकवणीचे आजही पालन केले जाते. आचार्य चाणक्य यांनी नात्यात धोका मिळत असेल तर कोणत्या चुका करू नये याबाबत आचार्य चाणक्य यांनी काही उपदेश केलेले आहेत.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार नात्यात भाबडा विश्वास, गडबड हे सर्वात मोठे शत्रू आहेत. प्रेमात किंवा कोणत्याही नात्याता धोका मिळतो तो याच दोन चुकांमुळे कत्यामुळे कधीही कोणावर लगेच विश्वास ठेवू नये. नाते बनवताना घाई-गडबड करू नये.

तुम्ही एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखत नसाल तर त्याच्यावर लगेच विश्वास ठेवू नका. घाई करू नका. अगोदर त्या व्यक्तीला समजून घ्या. त्याचा स्वभाव कसा आहे? त्याचे कुटुंब काय करते? तसेच तो सामान्य जीवनात कसा वागतो? या सर्व गोष्टी समजून घ्या आणि मगच कोणतेही नाते पुढे न्या. नात्यावर विश्वास ठेवा.

कोणतेही नाते नव्याने सुरू होत असेल तर तुमची आर्थिक स्थिती, तुमच्याकडे असलेले पैसे, कुटुंबातील माहिती अशा गोपनीय गोष्टी समोरच्या व्यक्तीला लगेच सांगून टाकू नका. काही बाबी समोरच्या व्यक्तीला कधीही सांगू नये. नाते पूर्णपणे घट्ट झाल्यानंतर तसेच नात्यात विश्वास संपादन झाल्यानंतरच या गोष्टी सांगाव्यात. अनेक लोक मात्र हा नियम पाळत नाहीत. त्यामुळे नात्यात विश्वासघात झाल्यावर नंतर पश्चात्ताप करत बसतात.

तुमच्यासोबत एखादी व्यक्ती फारच गोड-गोड बोलत असेल, तर ती व्यक्ती योग्यच आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. काही-काही लोक तुमचा फायदा घेण्यासाठी तुमच्यासोबत चांगले वागण्याचे नाटक करतात. त्यामुळे नवी मैत्री होत असेल किंवा तुम्ही प्रेमात पडत असाल तर वेळ घ्या. समोरच्या व्यक्तीला समजून घ्या. त्यानंतरच तुम्ही त्याच्याशी मैत्री करा, असे चाणक्य नीति सांगते.

(ही स्टोरी इंटरनेटवर असलेल्या प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. अंधश्रद्धा पसवरण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही.)