खोक्या भाईची मस्ती उतरवली, स‍तीश भोसलेच्या घरावर बुलडोझर, पाहा पहिले photos

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर खोक्या भोसलेच्या घरावर वनविभागाकडून कारवाई करण्यात आली असून, वनविभागाच्या जमीवर असलेलं हे घर पाडण्यात आलं आहे.

| Updated on: Mar 13, 2025 | 5:28 PM
1 / 7
खोक्या उर्फ सतीश भोसले हा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे, त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. शिरूरमध्ये ढाकणे कुटुंबातील वडील आणि मुलाला बेदम मारहाण केल्यापासून तो फरार होता.

2 / 7
अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे, त्याला महाराष्ट्रात आणलं जात आहे.

3 / 7
दरम्यान काही दिवसांपूर्वी वनविभागाकडून खोक्याच्या घराची झडती घेण्यात आली होती, या झडतीमध्ये खोक्याच्या घरातून जनावरांचं सुखलेलं मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य जप्त करण्यात आलं होतं.

4 / 7
तसेच त्याचं हे घर त्याच्या मालकीच्या जागेवर नसून, वनविभागाच्या हद्दीमध्ये असल्याचं समोर आलं आहे, या प्रकरणात त्याच्यावर वनविभागानं गुन्हा दाखल केला होता.

5 / 7
अखेर आता वनविभागाकडून त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. त्याचं घर पाडण्यात आलं आहे. यापूर्वीच त्याला नोटीस देखील देण्यात आली होती.

6 / 7
त्यानंतर आता वनविभागाकडून खोक्याच्या घरावर मोठी कारवाई करण्यात आली असून, खोक्याचं घर पाडण्यात आलं आहे.

7 / 7
खोक्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, त्यामुळे आता तो अडचणीत सापडला आहे. त्याच्यावर विविध प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.