
अभिनेता अली असगर हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे एक नाव आहे. अली असगर याने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. अली असगर याने मोठा खुलासा केलाय.

आता अली असगर याच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. अली असगर याने रूबीना दिलैक हिच्यासमोर हा खुलासा केलाय.

अली असगर म्हणाला की, ज्यावेळी माझी पत्नी डिलीवरीसाठी हॉस्पिटलमध्ये जात होती, त्यावेळी आम्ही खूप जास्त आनंदी होतो. मी शूटिंगला देखील गेलो.

ज्यावेळी मी शूटिंगवरून परत आलो तेंव्हा ती खूप जास्त त्रासात दिसली. तिला इंजेक्शन वगैरे दिले जात होते. ते पाहून मला काहीच सूचत नव्हते.

पत्नीची ती अवस्था पाहून मी परत आयुष्यात कधीच बाळाला जन्म द्यायचा नसल्याचे ठरवले होते. अली असगर हा आता दोन मुलांचा बाप असून अभिनेत्याच्या विधानाची चांगलीच चर्चा रंगत आहे.