
अभिनेता आणि बिग बाॅस फेम आसिम रियाज हा कायमच चर्चेत असतो. आसिम रियाज याची सोशल मीडियावर जबरदस्त अशीन फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

आसिम रियाज हा हिमांशी खुराना हिला डेट करत होता. अनेक वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केले. बिग बाॅसच्या घरातच यांची लव्ह स्टोरी सुरू झाली.

पाच महिन्यांपूर्वीच आसिम रियाज आणि हिमांशी खुराना यांचे ब्रेकअप झाले. आसिम रियाज हा मुस्लीम आणि हिमांशी ही हिंदू असल्याने यांनी ब्रेकअप केले.

आसिम रियाज आणि हेमांशी यांनी त्यांच्या ब्रेकअपचे कारण धर्म असल्याचेही म्हटले. आता हिमांशीसोबतच्या ब्रेकअपला अवघे काही महिने होत नाहीत तोवरच परत एकदा प्रेमात आसिम पडलाय.

आसिम रियाज याने एक फोटो शेअर केलाय. त्यामध्ये एक मुलगी दिसत असून तिने आसिमच्या खांद्यावर डोके ठेवल्याचे दिसतंय. यासोबतच तिने खास कॅप्शनही शेअर केले.